Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: आम्ही सनातन वगैरे मानत नाही, जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

कार्तिक पुजारी

मुंबई- सुप्रीम कोर्टाकडूनच न्यायाची अपेक्षा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणावर एकत्र सुनावणीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे या गोष्टी गांभीर्याने घेतल्या जात असल्याचं दिसतंय. याप्रकरणी आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या दिवशीची प्रतिक्षा आहे, असं शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

आव्हाड यांनी यावेळी सनातन विषयावर देखील भाष्य केलं. ज्या धर्मामुळे देशात जातीवाद आला. ज्या धर्मामुळे स्त्रीयांना अधिकार मिळाला नाही. तो सनातन धर्म असूच शकत नाही. सनातन हा धर्म नाही, तर हिंदू धर्मातील कट्टरतावादी लोकांचा तो गट आहे. त्यामुळे हा नवा शब्द कुठून आला हे मला समजत नाहीये. आम्ही २००३ पासून सनातनशी लढाई लढतोय, असं ते म्हणाले.

मला मारण्याचा प्रयत्न झाला. माझ्या घरावर हल्ला झाला. हे लोक सनातनी होते. हिंदू धर्म वसुदैव कुटुंबकमच्या वाटेवर जाणारा आहे. सर्वांना आपलं मानणारा आहे. देशामध्ये जो काही पाच हजार वर्षांपासून अन्याय, अत्याचार, शोषण लोकांचे झाले तो सनातनी लोकांनी केला आहे, असं ते म्हणाले.

तुकारामांना, बुद्धांना, महावीर जैनांना, बसवेश्वरांना, सावता माळींना कोणी छळलं असेल तर ते सनातनी लोकांनी. शिवाजी महारांचा राज्याभिषेक कोणी नाकारला तर तो सनातन्यांनी, ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना आत्महत्या कोणामुळे केली तर के सनातन्यांमुळे. महात्मा फुलेंना दगड-धोंडे, शेण कोणी मारले तर ते सनातन्यांनी. शाहु महाराजांची हत्या करण्याचा प्रयत्न सनातन्यांनी केली. महात्मा गांधींची हत्या सनातन्यांनी केली, असं आव्हाड म्हणाले.

राजकीय पक्ष हा जन्मदाता असतो. विधिमंडळ त्यामुळे पक्ष ठरवू शकत नाही. विधिमंडळ हा राजकीय पक्षाचा भाग आहे, राजकीय पक्ष विधिमंडळाचा भाग नाही. विधिमंडळ २०२४ मध्य नसेल, दुसरे विधिमंडळ असेल. विधिमडंळ नवीन तयार होऊ शकते किंवा ते पक्ष स्थापन करुन निवडणूक लढवू शकतात. ते पक्षावर दावा करु शकत नाहीत, अशी भूमिका आव्हाडांनी मांडली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army New Uniform: भारतीय लष्कराचा मोठा बदल! ८ वर्षांनंतर नवा ड्रेस कोड लागू; ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम, आर्मीचा 'देसी' लूक चर्चेत

T20 World Cup: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार का? भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्टच दिलं उत्तर

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Manoj Jarange Support : तुकाराम मुंढेंची बदली कराल तर... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Latest Live Updates Marathi: गृह लक्ष्मी' आणि 'गृह ज्योती' यांसारख्या जनहितार्थ असलेल्या गॅरंटी योजना बंद केल्या जाणार नाहीत- शिवकुमार

SCROLL FOR NEXT