Nawab Malik 
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik: नवाब मलिक यांना मोठा दिलासा! जामीनाला सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा जामीनाला 3 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी दोन महिन्यांसाठी जामीन दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. (ncp leader nawab malik got bail extension by supreme court for three months )

नवाब मलिक यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही. आम्ही ताजे रिपोर्ट सादर करत आहोत, त्यामुळं त्यांना अंतरिम जमीन देण्यात यावा, असं त्यांच्या वकीलाने कोर्टात सांगितलं. तसेच किडनी अजूनही योग्य पद्धतीने काम करत नाही. वैद्यकीय कारण लक्षात घेता त्यांना जमीन द्यावा अशी मागणी त्यांच्या वकीलांनी केली होती. ती मान्य झाली आहे.

नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीनाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सद्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. त्यांना किडनी संदर्भातील आजार असल्याचं सांगण्यात येतं. नवाब मलिक अजित पवार किंवा शरद पवार यांच्यापैकी कोणाला साथ देणार याबाबत मोठी चर्चा सुरु होती. नवाब मलिक यांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याचं सांगितलं जातं.

प्रकरण काय?

गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ ला अटक केली होती. त्यानंतर त्यांना ११ ऑगस्टला जामीन मंजूर झाला. यावेळी त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर झाला होता.

1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि हसीना पारकर यांचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल होता. या पटेलचे मलिकांशी व्यवसायिक संबंध असल्याचा आरोप आहे. तसेच नवाब मलिक यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला त्या दोघांनी कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावाने विकल्याचा आरोप आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT