NCP Vs BJP esakal
महाराष्ट्र बातम्या

'भाजपकडून मला आमदारकीसाठी तिकीट देण्याची ऑफर'

इम्रान शेख

'माझ्यावर राजकारण करून जर कोणी मला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी..'

रहिमतपूर (सातारा) : जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी (Satara District Bank Election) राजकारण झाल्याने शेवटच्या क्षणी पक्षाकडून मला अर्ज मागे घेण्यास सांगितले. पक्षावर असलेल्या विश्वासाने मी क्षणाचाही विचार न करता अर्ज मागे घेतला. माझ्यावर राजकारण करून जरी कोणी मला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी जिल्हा बँकेवर पुन्हा स्वाभिमानाने येईन, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) जिल्हाध्यक्ष सुनील माने (Sunil Mane) यांनी स्पष्ट केले.

रहिमतपूर पालिका (Rahimatpur Municipality), रहिमतपूर विकास सेवा सोसायटी व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माघार घ्यावी लागल्याने अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी येथे सुनील माने समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. त्या वेळी नगराध्यक्ष आनंदा कोरे, वासुदेव माने, अविनाश माने, बेदील माने, नंदकुमार माने, चांदगणी आतार, विकास तुपे आदी उपस्थित होते. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत सुनील माने यांच्याविषयी आदर व्यक्त करताना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची निंदा केली. त्याचबरोबर सुनील माने घेतील त्या निर्णयाबरोबरच राहण्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली.

NCP Sunil Mane

या वेळी सुनील माने म्हणाले, ‘‘राजकारणात नवीन संधी निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. जनता हीच माझी संधी आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना सध्याच्या विरोधी पक्षाकडून आमदारकीसाठी पक्षाची तिकीट देण्याची ऑफर देण्यात आली होती; परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढवण्याचे काम प्रामाणिकपणे व निष्ठेने केले. १९९९ पासून आजपर्यंत पक्षाचे नाव खाली जाईल, अशा प्रकारचे वर्तन केले नाही. पक्षाकडून मिळालेल्या सर्व जबाबदाऱ्या मी ताकदीने पूर्ण केल्या. मिळालेल्या संधीचा वापर सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी केला. सर्वसामान्यांचे काम करताना कोणाकडूनही एक रुपया घेतला नाही. तीन पक्षांचे सरकार असताना एकमताने काम करणे गरजेचे आहे. माझ्यावर राजकारण करून जर कोणी मला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी जिल्हा बँकेवर पुन्हा येईन. रहिमतपूर पालिका व सोसायटीत निर्विवाद वर्चस्व मिळवून दाखवू.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT