NCP Manthan Shibir Karjat Raigad MP Sunil Tatkare esakal
महाराष्ट्र बातम्या

'शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत आम्ही महायुतीत सहभागी झालो, तर आमचं काय चुकलं?'

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या जिवावर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घेतली आहे, ती आपल्याला पार पाडायची आहे.

सकाळ डिजिटल टीम

‘घड्याळ तेच वेळ नवी’ या वैचारिक शिबिरातून नवी दिशा घेत पक्षाची भविष्यात वाटचाल करायची आहे.

कर्जत (जि. रायगड) : ‘भिन्न विचारसरणीचे वेगवेगळे पक्ष देशात एकत्र येतात, तर मग आम्ही शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो तर आमचे काय चुकले?’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पक्षाच्या मंथन शिबिरात केला.

‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबिराला गुरुवारी सुरुवात झाली.’ ‘अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या जिवावर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घेतली आहे, ती आपल्याला पार पाडायची आहे,’ असे आवाहन तटकरे यांनी केले. अजित पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला आहे, त्यामुळे अजित पवार यांचे पक्षासाठीचे योगदान कोण विसरू शकत नाही, असेही ते म्हणाले.

‘घड्याळ तेच वेळ नवी’ या वैचारिक शिबिरातून नवी दिशा घेत पक्षाची भविष्यात वाटचाल करायची आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, हे कृतीतून दाखवून देऊया असे आवाहन तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ पैकी ४३ आमदार अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहतात याचाच अर्थ आपल्या नेतृत्वाने केलेले काम समोर येते. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका किती योग्य आहे हे आपल्याला जनतेपर्यंत पोचवायचे आहे, असेही तटकरे म्हणाले.

मराठा आरक्षण ही पक्षाची भूमिका

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही पक्षाची भूमिका असल्याचे पुन्हा एकदा सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, पक्षाची राष्ट्रीय मान्यता परत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT