Dhananjay Munde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde : "मला कोरोना झाला अन् ड्रायव्हर म्हणाला, गाडीची चावी तिथे ठेवलीये"

धनंजय मुंडे यांनी कोरोना काळात त्यांच्यासोबत घडलेला भयानक प्रकार सांगितला आहे.

दत्ता लवांडे

Parli News : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळी येथे अपघात झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. मुंबई येथे उपचार झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची सुटका करण्यात आली.

मुंबईत काही दिवस आराम केल्यानंतर त्यांचे काल परळी मतदारसंघात आगमन झाले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी 101 जेसीबी, 10 टन फुलं आणण्यात आले होते.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

आगमनाच्या सभेत झालेल्या भाषणात त्यांनी अनेक मुद्दे मांडले. यावेळी ते भावूक झाले होते. मी श्वास असेपर्यंत जनतेसोबत असेन असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. "मला मंत्रिपद मिळाल्यावर जसं स्वागत झालं नाही त्यापेक्षा दहा पट प्रेमाने माझं स्वागत आज तुम्ही केलं.

परळी वैद्यनाथाच्या कृपेने मला आज पुनर्जन्म मिळाला आहे. त्याने मला म्हटलंय की पुढचे दहा जन्म तुला याच मातीत जन्म घेऊन जनतेची सेवा करायची आहे" असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं यावेळी केलं.

"एखाद्याच्या आयुष्यात अनेकवेळा वाईट वेळा येत असतात. २०१९ ला विधानसभेचा निकाल लागला, मी जिंकलो होतो, त्यानंतर सरकारमध्ये मला मंत्रिपद मिळालं पण लगेच कोरोना आला आणि सगळ्यांना संकटांचा सामना करावा लागला.

पण या काळातही सामान्य जनतेला मी जेवढी शक्य आहे तेवढी मदत केली. कोरोना काळात शेतकऱ्यांच्या मालाला भाव नव्हता पण नाथ प्रतिष्ठानने शेतकऱ्यांचा माल खरेदी केला. ज्या लोकांना खाण्यासाठी रेशन नाही त्यांची जबाबदारी मी घेतली" असं मुंडे म्हणाले.

"मला कोरोना झाला अन् ड्रायव्हर म्हणाला, गाडीची चावी तिथे ठेवलीये"

"माझ्या मतदारसंघाची काळजी घेणे माझं कर्तव्य आहे पण मला ज्यावेळी कोरोना झाला होता त्यावेळी माणुसकी मेली होती. कारण त्यावेळी कुणी माणसाच्या जवळसुद्धा येत नव्हतं.

ज्यावेळी मला कोरोना झाला त्यावेळी मी माझ्या ड्रायव्हरला फोन केला आणि दवाखान्यात जाण्यासाठी त्याला गाडी घेऊन यायला सांगितलं त्यावेळी त्याने सांगितलं, "भाऊ तिथं चावी अडकवली आहे, तुमच्या स्वयंपाक्याला दवाखान्यात सोबत घेऊन जा, त्यालाही गाडी चालवता येते" हे माणुसकी मेल्याचं उदाहरण मी माझ्या डोळ्याने पाहिलं, अशी वेळ कुणावर येऊ नये" असं धनंजय मुंडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

SCROLL FOR NEXT