Rohit Pawar
Rohit Pawar 
महाराष्ट्र

दहा-दहा रुपये गोळा करुन त्यांनी गुलाल आणला होता : रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोकांनी मोठ्या उत्साहात माझी मिरवणूक काढण्याची तयारी केली. ही लोकं म्हणजे नेमके कोण तर माझा विजय व्हावा म्हणून गेली सहा सात महिने रात्रीचा दिवस करणारी माझी हक्काची माणसे आहेत. अगदी दहा दहा रुपये गोळा करुन त्यांनी गुलाल आणला होता, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमच रोहित पवार यांची शुक्रवारी जामखेडमध्ये मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत 30 जेसीबींच्या साहाय्याने गुलाल उधळण्यात आला. यावर जोरदार टीका होत असताना रोहित पवार यांनी याला उत्तर दिले आहे. तसेच त्यांनी मिरवणुकीनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतल्याचे फोटो ट्विट केले आहेत.

रोहित पवार यांनी म्हटले आहे, की सर्वांनी मिळून मोठ्या आनंदात मिरवणूक काढली. त्यांच्या आनंदात मी सहभागी झालो. पण यामध्ये कुठेही शेतकऱ्यांच्या भावना दूखावण्याचा हेतू नव्हता. मी बांधिलकी जपतो ती या मातीशी अन् लोकांशी. आपल्या आनंदामुळे एकाही व्यक्तीचा अपमान व्हावा, त्यांना वाईट वाटावं असा कधीच हेतू नव्हता व नसेल. राहिला प्रश्न तो माझ्या सामाजिक कामांचा, ज्या स्वच्छ मनाने मी यापुर्वी काम करत होतो त्याच स्वच्छ मनाने व अधिक वेगाने सामाजिक काम यापुढे करत राहिलं. सर्वसामान्य लोक व हितचिंतक हेच माझं बळ आहे. कोणाला उत्तर देण्यासाठी नाही तर कोणालाही वाईट वाटू नये म्हणून आपणासमोर या गोष्टी मांडतोय. यात जशी सामान्य माणसं होती तसेच जेसीबी असोशिएशनचे लोकही होते. त्यांनी आमच्या पद्धतीने तुमचा सत्कार करु असा आग्रह धरला. तो आग्रह मी मोडणार नव्हतोच कारण त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या. आम्हाला तुमचे आत्ताचे 4 तास द्या. आम्हाला गेली २५ वर्ष गुलाल लावता आला नाही. आत्ता नाही म्हणू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयुष चावलाने हैदराबादला दिला मोठा दणका! धोकादायक ट्रेविस हेडला धाडलं माघारी

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT