Rohit Pawar Nitesh Rane Sakal
महाराष्ट्र बातम्या

Nitesh Rane : छत्रपती शिवरायांपेक्षा शरद पवार मोठे?; रोहित पवार वादात

आता हे प्रकरण अधिक ताणलं जाईल की लवकरच मिटेल हे येणारा काळच ठरवेल.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांचं एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आला आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत रोहित पवारांच्या या पोस्टरकडे लक्ष वेधलं आहे. शिवाजी महाराजांपेक्षा मोठं कोण? असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटमधून विचारला आहे. त्यांचा रोख थेट शरद पवार यांच्यावर असल्याचं दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोच्या वर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावल्याचं या पोस्टरमध्ये दिसत आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवार यांच्या मार्फत गड किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याचंच हे पोस्टर आहे. या पोस्टरच्या मांडणीवरुन आता नितेश राणे नवा वाद उपस्थित करत असल्याचं दिसून य़ेत आहे. आता हे प्रकरण अधिक ताणलं जाईल की लवकरच मिटेल हे येणारा काळच ठरवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

Jaripatka Police Inspector Transfer : लाचलुचपत प्रकरण अंगलट; जरीपटका पोलिस निरीक्षकाची बदली

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT