mla rohit pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

रोहित पवारांना वाहतूक पोलिसाकडून चांगल्या वर्तणुकीची पावती

सकाळ डिजिटल टीम

पुणे : वाहतूक पोलिसांचा अनुभव नसेल असा व्यक्ती क्वचितच कोणी असेल. प्रत्येकालाचा कधीतरी वाहतूक पोलिसांचा चांगला-वाईट आनुभव आलेला असतो. वाहतूकीचे नियम मोडले तर लगेच पोलिस एखाद्याला पकडतात आणि मग चालक पोलिसांशी हुज्जत घालतात. पण अखेरीस पावती फाडली जाते, अशा वेळी त्या वाहतूक पोलिसांचा राग येतो. पण कधीतरी हेच वाहतूक पोलिस एखाद्याच्या कामी येतात, अपघात प्रसंगी एखाद्याचा जीव वाचवतात. नुकतेच आमदार रोहित पवार यांनी त्यांचा वाहतूक पोलिसांबद्दलचा असाच अनुभव सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. ज्यात वाहतूक पोलिसांनी पवारांना ते आमदार नसताना फाडलेल्या त्यांच्या पावतीचा दाखला देत त्यांच्या स्वभावाचं कौतुक केलं आहे.

रोहित पवार यांनी या प्रसंगाबद्दल त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी सांगीतलं की, दररोज शेकडो लोकांना तोंड देणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडून अचानक तुम्हाला कौतुकाचीही पावती मिळू शकते. मलाही काल असाच अनुभव आला. त्यांचा हा अनुभव त्यांनी सविस्तर लिहीला आहे ते लिहीतात की, वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांची काल पुण्यात एका ठिकाणी भेट झाली. अर्थातच यावेळी त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी रोहित पवारांसोबत फोटो काढायची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी फोटो काढला. पण गंमतीची गोष्ट अशी होती की, त्यातील एका कर्मचाऱ्याने मे २०१९ मध्ये रोहित पवार यांच्या गाडीला दंड आकारला होता. ती घटना रोहित पवार विसरले होते पण त्या पोलिस कर्मचाऱ्याने ती त्यांच्या लक्षात आणून दिली. इतकेच नाही तर पो 'तुम्ही आमदार नसताना तेंव्हाचा स्वभाव आणि आताचा स्वभाव यात काहीच फरक नसल्याचं सांगत दंडाची नाही तर चांगल्या वर्तणुकीची पावती दिली.' वाहतूक पोलिसांनी दिलेले हे 'प्रमाणपत्र' पाहून मलाही सुखद धक्का बसला असे रोहित पवार यांनी या पोस्ट मध्ये लिहीले आहे.

तसेच या प्रसंगाबद्दल लिहाताना, ऊन, थंडी, पाऊस याची कोणतीही पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी १२-१२ तास रस्त्यावर उभं राहून कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यांबाबत नेहमीच आदर वाटत आला आहे. नागरिकांनीही हुज्जत न घालता या कर्मचाऱ्यांना नेहमी सहकार्य करावं, असं आवाहन यावेळी पवार यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT