amol kolhe- ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Amol Kolhe: “भावी मुख्यमंत्री जयंत पाटील...”, म्हणणाऱ्या अमोल कोल्हेंनी केले अजित पवारांचं कौतुक

जयंत पाटील मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडतील असं अमोल कोल्हे यांनी म्हंटलं होतं

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसात राज्याचे भावी मुख्यमंत्री कोण असणार त्यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी राष्ट्रवादीतील जेष्ठ राजकीय नेत्यांसह अनेकांच्या नावांची चर्चा सुरू झाली. यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे राज्यभरात ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीत कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल या प्रश्नावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडतील, असं वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचं तोंडभरून कौतुक केल्याचं दिसून आलं आहे. (Latest Political Marathi News)

खासदार अमोल कोल्हे यांची मंगळवारी एक मुलाखत झाली. पिंपरी- चिंचवडमधील दिशा सोशल फाउंडेशनने खासदार अमोल कोल्हे यांची मुलाखत आयोजित केली होती. या मुलाखतीमध्ये अमोल कोल्हेंनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामुळेच मी शिरूर लोकसभेचा खासदार झालो असा खुलासा अमोल कोल्हेंनी केला आहे. तुम्ही भाजपामध्ये जाणार का? या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिलं आहे.

भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा उल्लेख करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. मी केवळ आणि केवळ अजित पवारांमुळं खासदार झाल्याचं दावा त्यांनी यावेळी केला आहे. अजित पवार की जयंत पाटील यांना अनुसरून ते वक्तव्य नव्हतं, माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असंही कोल्हे यांनी भावी मुख्यमंत्री जयंत पाटील या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.(Latest Political Marathi News)

तुम्ही भाजपामध्ये जाणार का? हा प्रश्न खासदार अमोल कोल्हेंना विचारताच काय करू असे त्यांनी प्रेक्षकांनाच विचारले, मग मिश्किल उत्तर देत म्हणाले “मतदारांमध्ये एक वाक्यता नाही, मग कशाला घाई करायची”, असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली. (Latest Political Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT