Chandrashekhar Bawankule And Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादीत लवकरच फाटाफुट, खासदार-आमदार भाजपात प्रवेश करणार; बालेकिल्ल्यात बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट

'राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत.'

सकाळ डिजिटल टीम

'राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत.'

कऱ्हाड : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राहिलेले आमदार, खासदार शिंदे गटात जावू नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खटाटोप सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी सत्तेत राहिली आहे. त्यामुळं त्यांचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. काही दिवस गेले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) मोठी फाटाफुट होणार आहे. त्यांचे अनेक खासदार-आमदार, नेते भाजप (BJP) आणि शिंदे गटात दाखल होतील, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

बावनकुळे हे कऱ्हाडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विरोधक सरकार पडणार असं वारंवार सांगत आहेत. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे हे शिंदे-फडणवीस सरकारबद्दल (Shinde-Fadnavis Government) काही ठिकाणी बोलत आहेत. त्यांच्या पक्षाचे राहिलेले आमदार, खासदार शिंदे गटात जावू नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खटाटोप सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी सत्तेत राहिली आहे. त्यामुळं त्यांचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. काही दिवस गेले की राष्ट्रवादीत मोठी फुटाफुट होणार आहे. त्यांचे खासदार-आमदार भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बावनकुळे पुढं म्हणाले, आमच्याकडं 164 चं बहुमत आहे. यापुढं जर बहुमत मागीतलं तर 185 चं बहुमत दिसेल. आता विरोधी पक्षांनी चिंता सोडावी, विरोधी पक्षाचं काम करावं. त्यांना चांगली संधी विरोधी पक्षात काम करायची मिळाली आहे. 2019 मध्येच ती मिळणार होती. मात्र, बेईमानीनं सरकार मिळवलं. म्हणून अडीच वर्षे सत्ता मिळाली. शिंदे-फडणवीस सरकार अनेक वर्षे सत्तेवर राहणार आहे. त्यामुळं आतातरी किमान दहा-वीस वर्षे विरोधी पक्षाचं चांगलं काम करावं, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT