Supriya Sule Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

बिचारे मुख्यमंत्री; मला त्यांची खूप काळजी वाटते - सुप्रिया सुळे

मुख्यमंत्र्यांच्या मागे मोठं षडयंत्र चाललंय, असा दावाही सुप्रिया सुळेंनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

विरोधकांकडून सातत्याने शिंदे - फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नसणं, विविध निर्णय, यासोबतच आता देवेंद्र फडणवीसांच्या कृतीचीही चर्चा होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. (Supriya Sule statement about CM Eknath shinde)

पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या महिलांना प्रमाण पत्र वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभात सुप्रिया सुळे बोलत होत्या. राज्य सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "नवीन सरकार गोंधळलेले आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान होतोय आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे बिचारे मुख्यमंत्री, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते.

राज्यातल्या राजकारणाबद्दलही सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, कोण कुठल्या पक्षात आहे हे आजकाल कळतच नाही. मी स्वतःच गोंधळात आहे. सध्या जे राजकारण सुरू आहे. ते महाराष्ट्राला न शोभणारं आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खूप काळजी वाटते. त्यांना प्रॉम्प्टींग करणं, चिठ्ठी देणं अशा कृतीतून मुख्यमंत्र्यांना कमीपणा दाखवायचं काम उपमुख्यमंत्री करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT