Supriya Sule
Supriya Sule 
महाराष्ट्र

कायद्याचा धाक राखण्यात सरकारला अपयश : सुप्रिया सुळे

सकाळवृत्तसेवा

पुणे : एकीकडे जातीअंतासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे जाती-जातींतील दऱ्या वाढत आहेत. त्यातूनच अशा घटना घडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कायद्याचा धाक अबाधित राखण्यात या सरकारला आलेले अपयश हेच आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

भाणगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना धक्कादायक आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भाणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही. अखेर आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविल्याचे समोर आले आहे. अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना जामीन कसा मिळाला, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT