NCP Political Crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : राष्ट्रवादी कोणाची? आज निवडणूक आयोगात सुनावणी; निकालाकडे राज्याचं लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावर आज सुनावणी पार पडणार आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात गुरुवारी (ता.९)सुनावणी होत आहे. मागील महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरुन नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता.

तर, सुनावणी लवकर संपविण्यासाठी घाई करीत असल्याबद्दल आयोगाने अजित पवार गटाला चांगलेच फटकारले होते. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मनिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत; तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत आहेत.

अजित पवार गटाने ‘राष्ट्रवादी’वर आपला हक्क सांगताना पी. ए. संगमा, सादिक अली या दोन प्रकरणांसह शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निकालाचा हवाला दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे उभी फूट पडली. अजित पवार शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत एकत्र येत सत्तेत सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची हा मुद्दा थेट निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. आज याच प्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. आज निवडणूक आयोग काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT