Sharad Pawar Sabha Dasara Chowk Kolhapur esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : कोल्‍हापुरात धडाडणार शरद पवारांची तोफ; निशाण्यावर कोण अजितदादा की मुश्रीफ? उत्‍सुकता शिगेला

शरद पवार यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर दसरा चौकात मोठमोठी पोस्‍टर झळकली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राष्‍ट्रवादीच्या फुटीनंतर श्री. पवार यांची कोल्‍हापुरात जाहीर निर्धार सभा होत आहे. पश्‍चिम महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रवादीचा बोलकिल्‍ला अशी या जिल्‍ह्याची ओळख आहे.

कोल्‍हापूर : राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज (ता. २५) येथे पक्षाची निर्धार सभा होत आहे. येथील दसरा चौकात (Dasara Chowk Kolhapur) दुपारी चार वाजता होणाऱ्या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत.

दरम्यान, सभेची तयारी पूर्ण झाली असून, दसरा चौकात मोठा मंडप उभारण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार सभेत कोणावर निशाणा साधणार, याची राजकीय वर्तुळात उत्‍सुकता शिगेला पोहोचली आहे.

पोस्‍टरबाजीतून फुटिरांसह भाजपला सूचक इशारा दिल्याने, पवारांचे मार्मिक टोले कोणावर आघात करणार, याची चर्चा आतापासूनच रंगली आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अध्यक्षस्‍थानी राहणार असल्याने राजकीय तर्कवितर्कही यानिमित्त लढवले जात आहेत.

राष्‍ट्रवादीच्या फुटीनंतर श्री. पवार यांची कोल्‍हापुरात जाहीर निर्धार सभा होत आहे. पश्‍चिम महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रवादीचा बोलकिल्‍ला अशी या जिल्‍ह्याची ओळख आहे. अजित पवार यांच्या फुटीनंतर जिल्‍ह्यात राष्‍ट्रवादी दोन गटांत विभागली आहे. हसन मुश्रीफ, राजेश पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाचे प्रमुख पदाधिकारीही अजित पवार गटात गेल्याने या सभेत शरद पवार यांच्यासोबत सामान्य कार्यकर्त्यांचे पाठबळ कितपत असेल, हे देखील स्‍पष्‍ट होणार आहे. श्री. पवार यांची मार्मिक टोलेबाजीतून समाचार घेणारे राजकीय व्यक्तिमत्त्व अशी ख्याती आहे.

त्यामुळे या सभेत राष्‍ट्रवादीतून फुटलेल्या मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांच्यावर श्री. पवार कशा पध्‍दतीने प्रहार करणार, याकडे जिल्‍ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी दोन दिवस जिल्‍ह्याचा दौरा करत पक्षाचे कार्यकर्ते, ज्येष्‍ठ नेतेमंडळी यांची भेट घेत, राजकीय घडामोडींबाबत भूमिका मांडत संवाद साधला.

बाप बापच असतो!

श्री. शरद पवार यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर दसरा चौकात मोठमोठी पोस्‍टर झळकली आहेत. ‘बाप बापच असतो, महाराष्‍ट्राच्या स्‍वाभिमानासाठी योध्‍दा पुन्‍हा मैदानात’ तसेच ‘महाराष्‍ट्राच्या मातीचा इतिहास फर्मानासमोर गुडघे टेकणाऱ्‍या खंडोजी खोपड्यांचा नाही, तर वतनावर पाणी सोडणाऱ्‍या कान्‍होजी जेध्यांचा आदर्श सांगतो, या आशयाचे फलक लावत राष्ट्रवादीने भाजप व फुटिरांना एक प्रकारे इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT