Ritesh Wasnik Dance Video Viral Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ritesh Wasnik Dance Video Viral: गौतमीच्या कार्यक्रमात पैसे उधळल्याने अजित पवार गटाचे सभापती अडचणीत? ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

भंडाऱ्यामध्ये पुर्वपरवानगी न घेता मोहाडी तालुक्यातील बीड, सातोळा या गावामध्ये लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

अंकिता खाणे (Ankita Khane)

भंडाऱ्यामध्ये पुर्वपरवानगी न घेता मोहाडी तालुक्यातील बीड, सातोळा या गावामध्ये लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रकरणी अजित पवार गटाचे पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. रितेश वासनिक यांनी एका कार्यक्रमात नृत्यांगणेवर पैसे उधळले होते, हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. ही घटना समोर आल्यानंतर वरठी पोलिसांत ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबधीचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

काय आहे प्रकरण?

मोहाडी तालुक्यातील बीड गावात सुरू असलेल्या मंडईच्या कार्यक्रमासाठी वासनिक यांनी हजेरी लावली होती. या वेळी लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रितेश वासनिक यांनी लावणीच्या गाण्यावर ठेका धरला. सभापतींनी गाण्यावर ठेका धरत नृत्यांगणेवर पैसे उधळले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या सभापतींपचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे

पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर नृत्यांगणा नाचत असताना रितेश वासनिक यांनी देखील ठेका धरला. त्याचबरोबर त्यांच्यासह इतर कार्यकर्ते देखाल उपस्थित होते. त्यांच्यासह जमलेल्या इतरांनीही नृत्यांगणेवर पैसे उधळले, हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता वासनिक वादात अडकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! विधानभवनाच्या लॉबीत राडा; पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

Court Decision: पत्नीला फोन आणि बँक पासवर्ड शेअर करण्यास भाग पाडणे म्हणजे घरगुती हिंसाचार; हाय कोर्टाचा निर्णय

Latest Marathi News Updates : विधानसभा लॉबीमध्ये आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते भिडले

R Madhavan Fitness Secrets: 55 व्या वर्षीही 'जोश' कायम! आर. माधवनचं तरुण दिसण्याचं हे आहे 'अस्सल' सिक्रेट

Jasprit Bumrah: ‘जसप्रीत बुमराह’बाबत मोठी अपडेट!, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत आता टीम इंडिया...

SCROLL FOR NEXT