Rohit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar: बच्चा म्हणणाऱ्या अजितदादांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, बच्चा है पर...

एक व्हिडिओ ट्विट करत त्यांनी अजित पवारांना निशाणा बनवलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : बच्चा असं संबोधत रोहित पवारांना डिवचणाऱ्या अजितदादांना आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एक व्हिडिओ ट्विट करत त्यांनी अजित पवारांना निशाणा बनवलं आहे. अजित पवारांनी दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना ही शेलक्या शब्दात टीका केली होती. (NCP Rohit Pawar reply to DCM Ajit Pawar who called him Bacha)

अजित पवारांनी बच्चा काय म्हटलं?

रोहित पवार यांच्या मालकीच्या 'बारामती अग्रो' या कंपनीच्या ठिकाणांवर ईडीनं नुकतीच कारवाई केली. या कारवाईवर भाष्य करताना रोहित पवारांनी अजित पवारांना टार्गेट केलं होतं. ते म्हणाले होते की, "सात-आठ दिवसांपूर्वी दिल्लीत कोण गेलं होतं? मागच्या सात दिवसात कोण कुठे गेलं? हे पाहाणं महत्त्वाचं आहे. (Marathi Tajya Batmya)

मी चूक केली असती तर अजितदादांसोबत भाजपमध्ये जावून बसलो असतो. पण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र धर्म आणि अस्मिता महत्त्वाची आहे. माझा आक्षेप ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाही. त्यांना दिलेलं काम ते करत असतात"

आरोपांवर अजित पवारांनी काय दिलं उत्तर?

पुणे दौऱ्यावर असताना अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी रोहित पवारांनी केलेल्या टीकेबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, "तो बच्चा आहे, बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नांना मी उत्तरं द्यावीत, एवढा तो मोठा नाही. माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते त्याला उत्तर देतील" (Latest Marathi News)

बच्चा संबोधनावर रोहित पवारांचं प्रत्युत्तर

अजित पवारांनी पत्रकार परिषदेत रोहित पवारांना बच्चा संबोधल्यानंतर रोहित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी एका जुन्या हिंदी सिनेमाच्या गाण्याची एक क्लीप शेअर केली आहे. या गाण्याचे बोल आहेत, "बच्चे मन के सच्चे, जगके आखों के तारे..." पण या गाण्याच्या अनुषंगानं रोहित पवारांनी सूचकपणे या ट्विटला कॅप्शन दिलं "बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर..."  (Latest Maharashtra News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer च्या जीवाला होता धोका, BCCI च्या मेडिकलने टीमने वेळीच पावलं उचलली नसती, तर...

Latest Marathi News Live Update : कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव भाजपामध्ये

Video : ईश्वरी करणार राकेशचा अर्णवच्या खुनाचा प्लॅन फेल; प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "सगळे मठ्ठ आहात का ?"

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

ठरलं! ‘कांतारा चॅप्टर 1’ वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री, तारिख जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT