ncp sharad pawar announces support to sambhaji raje for rajya sabha mp political news  esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यसभेसाठी संभाजी राजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभेच्या निवडणूकीमध्ये संभाजी राजे (Sabhaji Raje) हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, दरम्यान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे, शरद पवार (Sharad Pawar) यांनी यासंबंधी माहिती दिली. दरम्यान राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे आता संभाजी राजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शरद पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षाची मतसंख्या आहे, त्यावर हा निकाल आहे. मविआतील पक्षांशी अद्याप चर्चा केली नाही, पण राष्ट्रवादी पक्षापुरतं सांगायचे झाल्यास आमचा एक प्रतिनिधी निवडूण यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. त्यासाठीच्या मतांची गरज भागून आमच्याकडे 10 ते 12 मतं आमच्याकडे शिल्लक राहतात, शिवसेनेकडं सुध्दा काही मतं आहेत त्यांनाही काही अडचण नाही, कॉंग्रेसचा अकडा कमी जास्त असेल तर आमचे लोक त्यांना अनुमोदन देतील असे सांगितले.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे 27 मतं शिल्लक राहतात. तर अपक्ष आमदारांची संख्या धरून एकूण 46 मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना राज्यसभेत निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या पाठिंब्याच्या जोरावर संभाजीराजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT