Sharad Pawar News esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर...; शरद पवारांनी दिला थेट इशारा

सकाळ डिजिटल टीम

अमरावतीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे.

मागील दोन आठवड्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसरे महत्त्वाचे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. पहिल्यांदा अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं. त्यानंतर दुसऱ्या वेळी त्यांनी अचानक पुण्यातील दौरा रद्द केला होता.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन आमदारांनी आम्ही अजित पवारांसोबत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे अजित पवार आमदारांची जमवाजमव करीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र अजित पवारांनी ह्या सगळ्या बातम्या धुडकावून लावल्या. त्यानंतर चर्चा थांबली.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीत अॅग्रिकल्चरल फोरमला पवारांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवारांबद्दल त्यांनी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, भाजपच्या फोडाफोडीवर योग्यवेळी भूमिका घेऊ. कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर उत्तर देऊ, असा इशाराच पवारांनी दिला आहे.

२०१९पासून भाजपने 'मेगाभरती' सुरु केलेली आहे. राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते भाजपमध्ये गेलेले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. २०२४ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणखी बडे नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT