NCP Sharad Pawar On Devendra Fadnavis allegations over contractual recruitment ajit pawar mva politics  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरील फडणवीसांच्या आरोपावर शरद पवार हसले, म्हणाले...

कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीच्या मुद्द्यावर काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे.

रोहित कणसे

राज्यात कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विरोधकांकडून कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्यात आली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचं पाप हे महाविकास आघडी सराकरचं असल्याचे देखील सांगितले.

फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली. तसेच राज्याच्या जनतेची दिशाभूल केल्याने त्यांनी माफी मागवी अशी मागणी देखील केली. दरम्यान फडणवीसांच्या या आरोपांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

कंत्राटी भरतीचा निर्णय शरद पवारांच्या आशीर्वादाने झाला, या आरोपावर बोलताना शरद पवार हलेकच हसले, पुढे बोलताना ते म्हणाले की, माझा आशीर्वीद हे मी वाचंल... मी काही मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही, जाण्याचं काही कारण नाही. पण महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाचं मत तुम्ही सांगितलंत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आज त्याच्यावर एक स्टेटमेंट केलं, त्याच्यात असं स्पष्ट दिसतंय ज्यावेळेला या संबंधीचा निर्णय घेतला त्या बैठकीला अनेकसहकारी हजर होते. ते आजही सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची सहमती होती आणि आज ते यासंबंधीचे भाष्य करत नाहीत.

पवार पुढे म्हणाले की, एकंदर कंत्राटी कामगारांसंबंधी अस्वस्थता कशासंबंधी होती, तर नोकरीमध्ये कन्फरमेशन नाहीये. एका ठारविक काळापुरती नोकरी आहे. १०-११ महिने नोकरी मिळाल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य नाहीये. म्हणून कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यास आमचा विरोध होता आणि त्या बद्दलची भूमिका आम्ही मांडली.

आज एक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी मतं मांडली त्यामध्ये यापूर्वीच्या त्यांच्या सरकारने किंवा त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी या निर्णयाला संमती दिली होती आणि त्यांच्या संमतीने हे निर्णय झाले होते ही गोष्ट लपवण्याला अर्थ नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

जरांगे आणि सरकारमध्ये संवाद

राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांचा सुसंवाद झाल्याचं दिसतंय, त्याचा कालावधी ठरलाय असं दिसतंय. आम्ही देखील सरकार काय निर्णय घेतं याकडे आमचं लक्ष आहे. दोन दिवसांनंतर सरकारची भूमिका स्पष्ट होईल असं दिसतंय. यातून मार्ग निघून प्रश्न सुटला तर आम्हाला आनंद आहे असे शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT