NCP Sharad pawar reaction on ketki chitale facebook post  sakal
महाराष्ट्र बातम्या

केतकी चितळे प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

शरद पवार म्हणाले की, त्या पोष्टबद्दल आपल्याला काही माहिती नाही, मी केतकी चितळेला ओळखत नाही, त्यामुळे नेमकं काय झालं ते कळल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असे ते म्हणाले.

ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे. तर दुसरी केतकी चितळेच्या पोस्टवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील पत्रक जारी करत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे

केतकीने केलेल्या पोस्टमध्ये "ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक" असे शब्द वापरण्यात आले आहेत, या अक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका स्विकारली आहे. यानंतर या पोस्टवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

केतकी चितळे विरोधात कळवा पोलिस ठाण्यामध्ये कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पुण्यातदेखील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी केतक चितळेविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT