Sushma Andhare and Rupali Chakankar 
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: राष्ट्रवादी-शिवसेनेत मतभेद? चाकणकरांनी फोन न घेतल्याचा अंधारेंचा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांची टीका करण्याची पातळी खालावत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केलं होतं. त्यापाठोपाठ कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. NCP -Shiv Sena news in Marathi

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्याशी बोलणं टाळल्याचा दावा केला आहे. सुषमा अंधारे माध्यमांशी होत्या. अंधारे म्हणाल् या की, मी सुप्रिया सुळेंवर करण्यात आलेल्या टीकेचा मुद्दा मांडते. माझ्यासाठी महिला म्हणून काम करणं गरजेचं आहे. मी पक्षीय राजकारणात जाणार नसून महिला म्हणून याकडे पाहते.

अंधारे पुढं म्हणाल्या की, गुलाबराव पाटील यांची तक्रार करण्यासाठी मी रुपाली चाकणकर यांना दोनवेळा कॉल केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही, रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. यावर अद्याप चाकणकर यांचं प्रतिक्रिया आलेली नाही.

या व्यतिरिक्त सुषमा अंधारे यांनी संभाजी भिंडे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी संभाजी भिंडे यांनी महिला पत्रकाराला टिकली वरून वादग्रस्त विधान केलं होत. तर सोमवारी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोलताना शिवीगाळ केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Vastu Tips: धुळीच्या भीतीने घराच्या खिडक्या २४ तास बंद ठेवताय? वास्तूशास्त्रानुसार ओढावू शकतात 'या' ५ मोठ्या अडचणी!

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT