ajit pawar supriya sule 
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढावी लागली, असा दिवस येईल वाटलं नव्हतं; सुप्रिया सुळेंची खंत

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मी पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढले आहे? मी राजकारणात कोर्टबाजीसाठी आलेले नाही. मी सर्वसामान्यांची सेवा आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आले आहे. मला वाटलं नव्हतं असा दिवस येईल. पण, सत्यासाठी जे काही करावं लागेल, ते आम्ही करु. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राज्याची जनता यांच्या प्रेमासाठी आम्ही येथे आहोत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रीम कोर्टामध्ये आज ठाकरे गट आणि शिवसेना गट यांच्या आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावल्याचं सांगितलं जातं. अध्यक्ष निर्देशांचे पालन करत नाहीयेत. त्यांनी पुढील दोन महिन्यांत याबाबत निकाल द्यावा, अशी टिप्पणी कोर्टाने केल्याचं सांगण्याच येत आहे. सुनावणीनंतर सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे प्रकरण न्यायालयात आहे. याबाबत अनिल परब यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ठाकरे गट आणि पवार गटाची याचिका एकत्र करण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला न्याय मिळेल. नैतिकतेची ही लढाई आहे. व्यक्तिगत लढाई नाही. सत्य आणि असत्यामधील ही लढाई आहे. शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे ही लढाई जनतेची आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राहुल नार्वेकर यांनी दिलेले वेळापत्रक सुप्रीम कोर्टाने नाकारले आहे. तसेच निकाल देण्याबाबत दिरंगाई होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी नार्वेकर यांना मंगळवारपर्यंत नवीन वेळापत्रक देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी निर्णय घ्या. विधानसभा अध्यक्षपद हे घटनात्मक पद असले तरी आम्ही निर्णय घेऊ शकतो, असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाल्याचे समजते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT