Sharad Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Election Commission: राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला! राष्ट्रवादी कायदेशीर पाऊल उचलणार

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर सुनील तटकरे यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. जो निर्णय आला आहे त्याच्याविषयी अधिकृत माहिती आलेली नाही. आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांकडून सल्ला घेणार आहोत. आमच्याकडे निर्णयाची प्रत आलेली नाही. पंधरा दिवसांपूर्वी आयोगानं आम्हाला आमचे म्हणणे मांडण्यासाठी मुभा दिली होती. आम्ही राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आता आयोगानं जो निर्णय घेतला आहे त्याबाबत कायदेशीर पाऊल उचलणार आहोत असं त्यांनी म्हंटलं आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. 

निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Scheme: कामगारांसाठी दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन; काय आहे ही सरकारी योजना? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

केस कटिंग, दाढीचे दर वाढले; महाराष्ट्र नाभिक महामंडळाने जारी केलं नवं दरपत्रक

Social Media Post Safety Tips : सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, एक्स्पर्टनी दिला धोक्याचा इशारा

Monsoon Winds Strengthen : मॉन्सूनच्या वाऱ्याचा वेग वाढला! महाराष्ट्रात दक्षिण कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर चार दिवस मुसळधार

मुलीच्या वादाचं प्रकरण, २२ वर्षीय कॉलेज तरुणाकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; APIसह हवालदाराला अटक

SCROLL FOR NEXT