महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवार यांना साथ देणे काळाची गरज, खासदार नितीन पाटील यांचे प्रतिपादन!

Ajit Pawar: खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळ वृत्तसेवा

Latest Maharashtra News: किसन वीर व खंडाळा कारखान्यांला थकहमीचे ४६७ कोटी रुपये मिळालेले असून, ते फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांच्यामुळेच मिळाले. भविष्याच्या दृष्टिकोनातून अजित पवार यांच्या पाठीमागे उभे राहणे ही काळाची गरज आहे, असे खासदार नितीन पाटील यांनी सांगितले.

किसन वीर साखर कारखान्याच्या संचालक मंडळ, विविध संस्था व कामगारांच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर खासदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार पाटील म्हणाले, ‘‘खंडाळा व किसन वीर कारखान्याची निवडणूक लढविण्यास माझा विरोधच होता. दोन्ही कारखान्यांची परिस्थिती काय होती हे दिसत होते. सर्व बँका एनपीएत गेल्या होत्या. त्यामुळे कारखान्याचे लिलाव होणार हे दिसून येत होते; परंतु त्याचवेळी शेतकरी व कामगारांच्या व्यथा ऐकून घेऊन भावनेपोटी निवडणूक लढविण्याचा निर्णय मकरंद पाटील यांनी घेतला.

त्या वेळी कामगारांनाही सांगितले होते, की संघर्षाची तयारी ठेवली तरच यश मिळेल. त्यापद्धतीने शेतकरी व कामगारांनी साथ दिली व कारखाना ताब्यात घेतला. त्यावेळीच कारखाना कर्जातून बाहेर काढण्याचे मायक्रो प्लॅनिंग केले होते. त्यानुसारच पुढील पावले टाकत होतो. आपल्या दोन्ही कारखान्यांची ४६७ कोटींची थकहमी मंजूर होऊन खात्यात वर्ग झालेली आहे.’’

प्रमोद शिंदे यांचेही भाषण झाले. कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशीला जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT