Neelam Gorhe
Neelam Gorhe  
महाराष्ट्र

Kirit Somaiya : 'मला पेनड्राइव्ह दिलाय, आता तो बघणं म्हणजे…'; नीलम गोऱ्हेंनी सभागृहात मांडला महत्वाचा मुद्दा

रोहित कणसे

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडीओचे पडसाद पावसाळी अधिवेशनात देखील पाहायला मिळत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात या प्रकरणी चौकशीची मागणी केली. तसेच यासंबंधीचा पेनड्राइव्ह दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला.

दरम्यान यानंतर नीलम गोऱ्हे यांनी या पेनड्राइव्ह आणि व्हारल व्हिडीओबाबत काही महत्वपूर्ण बाबी सभागृहात मांडल्या. नीलम गोऱ्हे सभागृहात बोलताना म्हणाल्या की, या संपूर्ण प्रकरणात अस्वस्थ करणारी बाब समोर येते आहे.

चॅनेलवर हे सगळं घराघरात दाखवलं जात आहे. मी विनंती करेल की आपल्याकडे आलेले व्हिडीओ तुम्ही ब्लर करता तरी काय कृत्य चाललंय ते दिसेल अशा पध्दतीने परत-परत दाखवता. त्यामुळे हे व्हिडीओ दाखवताना थोडंफार तरी बंधन ठेवा. पोलिसांची जी चौकशी होईल त्यासाठी या वाहिन्यांनी त्यांच्याकडील माहिती गोपनीय स्वरूपात जरूर पोलिसांना द्यावी ज्यामुळे पोलिसींना चौकशीत मदत होईल असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पेनड्राइव्ह पाहणे म्हणजे…

नीलम गोऱ्हे यांनी आंबादास दानवे यांनी दिलेल्या पेनड्राइव्हबद्दल बोलताना सांगितले की, तुम्ही मला पेनड्राइव्ह दिलाय, आता तो बघणं म्हणजे फार कठिण परीक्षा आहे. पण मी महिला पोलिस अधिकारी, महिला डॉक्टर यांना बघायला सांगून त्यांचं मत घेईन. पण या प्रकरणात महिलेची तक्रार आली पाहिजे. ती भगिनी ऐकत असेल तर तिने सभागृहावर विश्वास ठेवावा, यापूर्वी पीडित पहिलांनी ऐकून नेत्यांशी संपर्क साधले आहेत असेही नीलम गोऱ्हे यावेळी सभागृहात बोलताना म्हणाल्या.

यादरम्यान आज विधान परिषदेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची अतिशय सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी होईल, असे अश्वासन दिलं आहे. तसेच कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे या प्रकरणात आता अजून काय माहिती समोर येईल हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

India Aghadi : राहुल गांधींवर ‘इंडिया’चा दबाव

Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

Sasoon Hospital : मेफेड्रोन प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया मात्र अद्याप फरार

Mahayuti Leaders : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT