mla prakash phaterpekar esakal
महाराष्ट्र बातम्या

‘मी कधीही उद्धवसाहेबांची साथ सोडणार नाही, पक्षांतराच्या चर्चेनंतर फातर्फेकरांचं स्पष्टीकरण

महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत महामोर्चा

रुपेश नामदास

uddhav thackeray, mla prakash phaterpekar: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांविषयी वादग्रस्त विधान करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा वाद चिघळला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतल घटक पक्षांच्या वतीने महामोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, अजित पवार अशा नेत्यांनी सभेत उपस्थितांना संबोधीत केलं. मात्र एकिकडे मोर्चा चालू असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर हे आज पार पडलेल्या मोर्चात सहभागी न होता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत एका कार्यक्रमात एकत्र उपस्थित झाल्याच्या बातम्या आणि फोटो दिवसभर व्हायरल होत होते. मात्र आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी फेसबुक पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे.

त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'खोट्या बातम्या पसरवणे बंद करावे! मी कधीही शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांची साथ सोडणार नाही. आज सकाळी विभागातील स्थानिक शासकीय महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला भेट देऊन महाविकास आघाडीच्या महामोर्च्याला सक्रिय उपस्थित राहिलो.

प्रसारमाध्यमांसाठी महामोर्च्यातील व्यासपीठावरील छायाचित्रे जोडले आहेत. #TRP साठी प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारचे खोट्या बातम्या पसरवणे आधी बंद करावे' त्यामुळे फातर्फेकर ठाकरे गटातच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: RBIचा रेपो दराबाबत मोठा निर्णय! तुमच्या लोन, EMI आणि FDवर काय परिणाम? महागाई वाढणार?

CIDCO House: सर्वसामान्यांना स्वप्नातलं घरं मिळणार, सिडको १९ हजार घरे बांधणार; पण कुठे आणि कधी?

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Latest Marathi News Live Update: वाढत्या उष्णतेमुळे वांग्याच्या उत्पन्नात घट, शेतकरी चिंतेत

Video Viral : शार्दूल ठाकूरने बाद करताच वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला; तो फटका का खेळला? स्वतःवरच चिडला

SCROLL FOR NEXT