Tanaji Sawant 
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus: चीनमधल्या BF.7 व्हेरियंटची महाराष्ट्रात नोंद नाही - तानाजी सावंत

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगानं वाढायला लागला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढण्यास कारणीभूत ठरलेला नवा कोरोना व्हेरियंट BF.7 चा भारतात शिरकाव झाला आहे. देशात या व्हेरियंटचे विविध राज्यांमध्ये चार रुग्ण आढळून आले आहेत पण महाराष्ट्राचा समावेश नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. (new corona variant from China have been reported in India but not Maharashtra says Tanaji Sawant)

आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, "चीनमध्ये आणि जगभरात सध्या कोरोनाचं मीडियामधून चित्र दिसत आहे. त्यातून केंद्र सरकारनं याची गंभीर दखल घेतली तसेच त्यांनी राज्यांनाही सांगितलं की तुम्ही सजग राहा. तसेच सोशल मीडियातून चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याची चर्चा होती. पण असा कुठलाही रुग्णाची नोंद महाराष्ट्रात झालेली नाही"

त्यामुळं अशा पद्धतीच्या बातम्या येत असतील तर आरोग्य विभाग त्यासाठी सजग आहे. यावेळी घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही. कारण कोविडचे दोन्ही डोस आणि ६० वर्षांवरील बूस्टर डोसही आपण ६० ते ६५ टक्के लोकांना दिलेला आहे. त्यामुळं घाबरुन जाण्याचं कारण नाही. आज आपल्याकडे पायाभूत सुविधा, मेडिकल्या टीम तयारीत आहेत. या तयारीचा आढावा बैठक आज पार पडली. तसेच याबाबत जिथे गरज असेल तिथं मेडिकल पायाभूत सुविधा आम्ही पुरवू असंही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

हे ही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

Indian History : भारताचा इतिहास केवळ राजा, सैन्य आणि विजयापुरता मर्यादित नाही; डॉ. कृष्ण गोपाल!

कल्याण डोंबिवलीत ठाकरेंसह शिंदेंना धक्का, भाजपने एका दगडात मारले दोन पक्षी; बड्या नेत्याचा भाजपप्रवेश

SCROLL FOR NEXT