Governor-Bhagat-Singh-Koshyari 
महाराष्ट्र बातम्या

भगत सिंह कोश्यारींनी मराठीतून घेतली राज्यपालपदाची शपथ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी आज (गुरुवार) शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.

राजभवनात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उत्तराखंडचे वनमंत्री एच.एस. रावत, कृषी मंत्री सुबोध उनियाल, राज्यमंत्री रेखा आर्य, राज्यमंत्री डॉ. दान सिंह रावत, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी कोश्यारी यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती यांच्या आदेशाचे वाचन केले. 

शपथविधीवेळी लोकायुक्तांची हजेरी 
न्या.एम.एल.तहिलियानी, सेवा हक्कचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.शशिकला वंजारी यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, चित्रपट सृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपालांविषयी थोडक्यात...
राज्यपाल कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. त्यांनी उत्तरप्रदेशातील राजा इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. परवत पियूष या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. त्यांनी 'उत्तरांचल प्रदेश क्यू?' आणि 'उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान' या दोन पुस्तकांचे लेखन केले.

कोश्यारी हे 30 ऑक्टोबर 2001 ते 1 मार्च 2002 या कालावधीत उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार, लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कामे केली आहेत.

(सौजन्य : डीजीआयपीआर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

Satara Accident : शिरवळ–लोणंद रस्त्यावर भीषण अपघात; वीर धरणाजवळ दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, सात गंभीर!

Sheetal Tejwani Arrest : शीतल तेजवानीची रवानगी येरवडा कारागृहात; ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत मौन!

Solapur News : शेतकऱ्यांच्या तक्रारीला यश; आमदार खरे यांच्या हस्तक्षेपाने लांबोटी विद्युत केंद्रातील अभियंता निलंबित!

Latest Marathi News Live Update : महावितरणने एका झटक्यात फेडले १२,८०० कोटींचे कर्ज

SCROLL FOR NEXT