Punyashlok Ajilyadevi Holkar solapur univercity Esakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यापीठात मुलांसाठी नवे वसतिगृह! आजपासून प्रवेश सुरू; वर्षासाठी ६५०० रुपयांचे भाडे अन्‌ मेससाठी द्यावे लागणार दरमहा २६०० रूपये

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश सध्या सुरू झाले आहेत. विद्यापीठामधील ११ संकुलामध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलामुलींना वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळणार आहे. प्रवेशासाठी साधारणतः: एक महिन्याची मुदत असणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश सध्या सुरू झाले आहेत. विद्यापीठामधील ११ संकुलामध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलामुलींना वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळणार आहे. प्रवेशासाठी साधारणतः: एक महिन्याची मुदत असणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ११ संकुले असून दरवर्षी चार हजारांहून अधिक विद्यार्थी त्याठिकाणी प्रवेश घेतात. खेड्यापाड्यातून शेकडो विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेतात, त्यांना स्वस्तात राहाण्याची सोय व्हावी, जेवणही स्वस्तात मिळावे म्हणून विद्यापीठात तीन वसतिगृहे आहेत. सध्या मेसची निविदा जाहीर करून मक्तेदारही अंतिम केला आहे. वसतिगृहांमधील प्रवेश अंतिम झाल्यावर मेस सुरू होईल, अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक केदारनाथ काळवणे यांनी दिली.

वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी साडेसहा हजार रुपये आणि मेससाठी दरमहा दोन हजार ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या विद्यापीठाचे सत्र सुरू झाले असून आता २ व ५ जुलैला प्रवेशपूर्व परीक्षा आहेत. त्या झाल्यानंतर लगेचच निकाल प्रसिद्ध होऊन प्रवेश प्रक्रिया उरकली जाणार आहे. वसतिगृहात राहण्यासाठी आतापासूनच विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागणार आहेत.

यावर्षीपासून मुलांसाठी नवे वसतिगृह

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मुलींचे ३५० क्षमतेचे वसतिगृह असून १२० क्षमतेचे मुलांचेही वसतिगृह आहे. विद्यापीठाजवळ हिरज रोडवर २५० क्षमतेचे मुलांसाठी नवे वसतीगृह बांधण्यात आले आहे. यंदापासून त्याठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यास जात प्रवर्गनिहाय विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून प्रवेश दिला जातो. याशिवाय विद्यापीठात २४ विद्यार्थी क्षमतेचे आंतरराष्ट्रीय वसतिगृहदेखील असून त्याठिकाणी केवळ परदेशातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो.

‘कमवा व शिका’तून विद्यार्थ्यांना संधी

विद्यापीठाकडून दरवर्षी गोरगरीब कुटुंबातील १०० विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेअंतर्गत निवडले जाते. त्यासाठी अर्ज मागविले जातात आणि ऑगस्टमध्ये विद्यार्थी अंतिम केले जातात. या योजनेतून प्रत्येक दिवशी दोन तास त्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ विविध काम करून घेते आणि त्या बदल्यात त्याला प्रत्येक तासाचे ६० रुपये दिले जातात. या रकमेचा त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लाभ व्हावा हा योजनेचा हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT