गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीवर राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. सर्व पक्षांकडून या निवडणूकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ येथील पोटनिवडणुका महाविकास आघाडी लढवण्यावर ठाम असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं आहे.
मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, 'मी गुरुवार आणि शुक्रवारी पुण्यात असेन. माझ्याकडे सात ते आठ जणांनी उमेदवारी मागितली आहे. मला मिञ पक्षासोबत बोलावं लागेल. त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत. शिवसेनेसोबत आम्ही चर्चा केली आहे. उद्या आमदारांची आमची बैठक आहे. त्यामध्ये देखील आम्ही स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार आहोत.'
तर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, चिंचवड व कसबा या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक लढवण्यासाठी आम्ही ठाम आहोत. कोल्हापूर, पंढरपूर, नांदेड आणि देगलूरमध्ये पोटनिवडणुका झाल्या. त्या बिनविरोध झाल्या नाहीत याची आठवण अजित पवार यांनी यावेळी करुन दिली. त्याचबरोबर भाजप सर्व पक्षांना पत्र लिहुन पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
दरम्यान, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे चिंचवड विधासभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबात चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.