Nilesh Rane Advice to Sambhajiraje esakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांचा डाव वेळीच ओळखा; निलेश राणेंचा संभाजीराजेंना सल्ला

'शरद पवार यांनी आमची उरलेली मतं राजेंना देऊ असं सांगून राजेंना अडचणीत टाकलंय'

सकाळ डिजिटल टीम

'शरद पवार यांनी आमची उरलेली मतं राजेंना देऊ असं सांगून राजेंना अडचणीत टाकलंय'

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून संभाजीराजे छत्रपती ही निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजीराजेंना आधीच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे यावरुन आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान, आता भाजपाचे निलेश राणे यांनी संभाजीराजे छत्रपतींना सल्ला दिला आहे. (Nilesh Rane Advice to Sambhajiraje)

यासंदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी ज्यसभेला अपक्ष उभे राहणार अशी घोषणा केली. लगेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आमची उरलेली मतं राजेंना देऊ असं सांगून राजेंना अडचणीत टाकलं आहे. उरलेली मतं राजघराण्याला? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाहीत, असा खोचक टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

दरम्यान, संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुलं पत्र (letter) लिहिले असून निवडणुकीत विजयी होण्यासाठी सर्वांच्या मदतीची आवश्यकता असल्याचे संभाजीराजे यांनी पत्रातून नमूद केलं आहे. भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीनं आपल्याला मदत करावी, अशी विनंती संभाजी राजेंनी घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत राजकारण विरहित कार्य करीत आलो असल्याचेही ते म्हणाले आहेत.

सध्या सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) होऊ घातली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आम्ही आमची उरलेली मतं छत्रपती संभाजी राजेंना देऊ, असं म्हटलं आहे. शिवसेनेकडून मात्र याउलट वक्तव्य आलं असून सहावी जागा लढणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. महाआघाडीचा दुसरा उमेदवार शिवसेनेच्या कोट्यातून असेल आणि त्या उमेदवाराची निवड कशी करायची याची रणनीती पक्षातील नेते ठरवतील. पण मला खात्री आहे की शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडला जाईल, असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT