महाराष्ट्र बातम्या

'अजित पवार हिम्मत असेल तर 'त्या'ची पक्षातून हकालपट्टी करा'

नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा,

सकाळ डिजिटल टीम

नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा.

हिंगोलीतील वसमत शहरातील छत्रपती शिवाजी महराजांचा पुतळा दाखल झाला. मात्र येथे घटलेल्या एका प्रसंगामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका करण्यात आली. वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी अश्वावर उभे राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण केला. यावरून राजकीय वर्तुळात मोठा वादंग निर्माण झाला आहे. अश्वावर उभे राहून महाराजांना हार घातलानाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यासह पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान या प्रसंगावरून भाजपाचे निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्वीट करत राष्ट्रवादीवर खरमरीत टीका केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे यांना भर चौकात फटके टाकले पाहिजे. या पक्षात सारे औरंगजेबासारखे आहेत. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा, असे आव्हानही त्यांनी केल आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चूक लक्षात आल्यावर आमदार नवघरे यांनी माध्यमांसमोर माफी मागितली आहे. त्यांना रडू कोसळले. यावेळी ते म्हणाले, 'मी एकट्यानेच पाप केले असेल तर मला फाशी द्या. अनेक जण माझ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालण्यासाठी अश्वावर चढले होते. मग टीकेची झोड माझ्यावरच का? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. 'माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा', अशी माफीही त्यांनी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT