political esakal
महाराष्ट्र बातम्या

'CM ठाकरेंच्या 1100 प्रॉपर्टी असतील, आता फक्त 11 सापडलेत'

उद्धव ठाकरेंचे व्यवहार त्यांची सासरवाडीतील लोक हाताळताहेत, निलेश राणेंचा टोला

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक कारणांवरून आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (CM Uddhav Thackeray) निकटवर्तीयांवर आणि नातेवाईकांवर कारवाईचे सत्र सुरुच आहे. आता ईडीने (ED) मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्याची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यावरून प्रकरण पुन्हा तापलं आहे. यासंदर्भात भाजपाचे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, उद्धव ठाकरेंचा मेहूणा पाटणकर यांच्या 11 प्रॉपर्टी ईडीने जप्त केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे बहुतेक व्यवहार हे त्यांची सासरवाडीतील लोक हाताळत आहेत. त्यांच्या जवळच्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे ११०० प्रॉपर्टी असतील त्यातल्या फक्त ११ सापडलेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, ठाण्यातील 'नीलांबरी' प्रकल्पातील ११ सदनिका हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या आहेत. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. यापूर्वी मनी लाँडरींगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच मालमत्तेवर ईडीने कारवाई केल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे हे प्रकरण कोणतं वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT