Rape case sakal media
महाराष्ट्र बातम्या

गतिमंद मुलीवर अत्याचार; महिलेसह ९ जणांना अटक

जालिंदर सत्रे

पाटण : अल्पवयीन व गतिमंद मुलीस फिरायला नेण्याच्या बहाण्याने महिलेनेच अन्य लोकांशी शरीरसंबंध (Sexual assault crime) ठेवण्यास भाग पाडल्याची घटना तालुक्यात उघडकीस आली. संबंधित पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून महिलेसह नऊ जणांवर गुन्हा दाखल (Nine Culprit arrested) करून त्यांना अटक केली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या संशयितांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. त्या संबंधितांना कऱ्हाडच्या न्यायालयात (Karhad Court) हजर केले असता पोलिस कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी सांगितले, की अटक केलेली महिला त्या मुलीच्या घराशेजारी राहते. ती महिला त्या अल्पवयीन, मतिमंद मुलीला खायला देऊन फिरायला नेत असत. त्याच कालावधीत त्या मुलीला बाहेर नेऊन त्या लोकांशी ओळख करून देऊन त्या लोकांशी वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. १७ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान घटना घडली. संबंधित अल्पवयीन मुलीवर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार झाला.

घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन व मतिमंद मुलीला ओळखीचा फायदा घेऊन संबंधित महिलेने पैसे कमविण्यासाठी मार्ग अवलंबल्याचेही पुढे आले आहे. नेहमीच खायला देते, फिरायला नेते आणि पैसे देते, अशी आमिषे दाखवून त्या महिलेने मुलीची त्या लोकांशी ओळख करून दिली. एकावेळी एकाची ओळख व त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आहे. असे आठ लोक आहेत. या एक महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी मतिमंद मुलीवर अत्याचार झाला.

मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. त्यात महिलेसह नऊ जणांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक निंग्रज चौखंडे तपास करत आहेत. संशयितांना अटक करण्यास सुरुवात केली. मात्र, नक्की काय प्रकार आहे लक्षात येत नव्हते. सकाळी अटक केलेल्या संशयितांचे नातेवाईक पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी संशयितांची नावे जाहीर केली नाहीत. ढेबेवाडी विभागातील घटना ताजी असताना पाटण परिसरातील घटनेने झोप उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Rashmika wedding: ना पुरोहित , ना अग्नि; तरीही पवित्र! जाणून घ्या रश्मिका–विजयच्या कोडावा पद्धतीतील विवाहसोहळ्यामागील अनोख्या परंपरा

Silver Buying Tips : ऑनलाइन सिल्वर ज्वेलरी खरेदी करताय? मग बनावट चांदीपासून राहा सावध, आत्ताच पाहा फेक ओळखायच्या 'या' 5 ट्रिक्स

Akola News : स्मार्ट मीटरचा पातूर पोलीस स्टेशनला दणका; चार महिन्यांचे ५२ हजार रुपये बिल थकीत, वीजपुरवठा खंडित

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT