nitesh rane tweet criticized by aditya thakare
nitesh rane tweet criticized by aditya thakare esakal
महाराष्ट्र

नारळ फुटता फुटेना, स्वप्न काही सूटेना; ठाकरेंवर राणेंचे टीकास्त्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मराठी भाषा कोणासमोर रुकणार नाही आणि झुकणारही नाही. ही दिल्लीला झुकवणारी भाषा आहे. कितीही हल्ले केले तरी झुकणारा नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त केले. शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी 2024 मध्ये दिल्लीत बसणार म्हणजे बसणार! असे विधान केले यावर भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विटरवर ठाकरे याच्या पूजनाचा व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.

नितेश राणेंनी काव्यात्मक स्टाईलमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. नितेश राणे यांनी जो व्हि़डिओ शेअर केला आहे. यामध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कार्यक्रमाच्या ठिकाणी नारळ वाढवत असताना दिसत आहेत. नारळ वाढवत असताना दोन ते तीन वेळा नारळ दगडावर फोडला तरी नारळ फुटत नाही. यावरून राणे यांनी कविता करीत निशाणा साधला. ते म्हणतात, काही करता साधं नारळ फुटता फुटेना, पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सूटेना!! असा टोला लगावला आहे.

आज आमची तिसरी पिढी आहे. मी लहानपणीपासून या सर्व नेत्यांना मंचावर बघतो. इतर पक्ष राजकीय नाटक करत असतात. पण आपण एक परिवार असतो. मराठीची चिंता दूर ठेवत आजचा दिवस साजरा करण्याचा आहे,असं ठाकरे म्हणाले. (Marathi Bhasha Gaurav Din)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT