Nitesh Rane 
महाराष्ट्र बातम्या

Nitesh Rane : हिंदूंवर खोट्या केसेस दाखल करू नयेत : अन्यथा आमच्याशी गाठ आहे

विलास कुलकर्णी

राहुरी, ता. ५ : "देशात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. येथे औरंग्याचे स्टेटस ठेवणाऱ्यांना जागा नाही. धर्मांतराचे प्रकार खपवून घेणार नाही. राज्यात महिला भगिनी सुरक्षित आहेत. हिंदुत्ववादी समाज व कार्यकर्ते एकटे नाहीत. त्यांच्यावर पोलिसांनी चुकीच्या, खोट्या केसेस दाखल करू नयेत. अन्यथा आमच्याशी गाठ आहे." असे आमदार नितेश राणे हिंदू जन आक्रोश मोर्च्यात म्हणाले.

राहुरी येथे आज हिंदू जन आक्रोश मोर्चा वेळीच्या सभेत आमदार राणे बोलत होते.यावेळी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग, एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, हर्षदा ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज मोरे महाराज, आदिनाथ महाराज दुशिंग यांचीही भाषणे झाली.

आमदार राणे म्हणाले, "उंबरे प्रकरणात पोलिसांतर्फे योग्य कारवाईची अपेक्षा होती. तेथे अल्पवयीन मुलींना धर्मांतरासाठी जबरदस्ती केली जात होती. त्यांना वाचवणाऱ्यांवर खोट्या केसेस टाकल्या गेल्या. आठ-दहा तास कोंबडा बनवून धमक्या दिल्या. तुम्हाला कोण फोन करतंय सांगा?

"त्यांना मी फोन करतो. उद्याही फोन करणार. तुम्ही मला काही करु शकत नाहीत. पोलीस खात्यात काही सडके आंबे आहेत. ते सरकारचे व पोलीस दलाचे नाव खराब करीत आहेत. आमच्या समाजाच्या मुलींचे धर्मांतर करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल. तर त्यांना आम्ही वाचवायचे नाही काय?"

"हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर चुकीच्या केसेस टाकायच्या नाहीत. आम्ही पण मंत्रालयात बसलोय. मला गृहमंत्री बनायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. शपथ न घेता अर्धे गृहमंत्री आपणच आहोत. मी फोन केल्यावर कुठल्या पोलिसांची नाही म्हणायची हिम्मत आहेे. उगाच आमच्यावर सिंघमगिरी करू नका."

"हिंदू समाजाविरुद्ध जिहादींचे षडयंत्र चालू आहे. त्यांचे आमच्या जमिनींवर अतिक्रमणे चालू आहेत. महाराष्ट्रात घुसलेले पाकिस्तानी, बांगलादेशी रोहिंगे शोधून त्यांना एटीएसच्या माध्यमातून राज्यातून हकलविण्याचे काम सुरू आहे. त्यांना कुणी वाजवायचा प्रयत्न करेल, अशांना पाकिस्तानात हाकलून देऊ."

डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे हिंदू समाज पालन करतो. आमच्या कुठल्याही सणाला प्रदूषणाचे नियम निघतात. दिवाळीत फटाक्यांचा आवाज. रात्री दहापर्यंतची बंधने. होळी, दसरा, गणपती उत्सवात मिरवणुकांवर नियम लादले जातात. आमच्या मंदिरांचा, प्रार्थनेचा कधीच कुणाला त्रास होत नाही."

"परंतु, सगळे नियम आम्हीच पाळायचे काय? त्यांचे दिवसातून पाच वेळा भोंगे वाजतात. त्यांच्या आवाजाचा त्रास होतो. त्यांच्या भोंग्यांना प्रदूषणाची नियम नाहीत? त्यांनी घरात बसून प्रार्थना कराव्यात. आमचे कान खराब करू नये. प्रत्येकाने आपला धर्म सांभाळावा. आम्हाला हिंदू म्हणून जगू द्यावं. आम्ही तुम्हाला आडवे येत नाही. तुम्ही आम्हाला आडवे आलात. तर दोन पायावर घरी जाऊ देणार नाही." असेही आमदार राणे यांनी ठणकावले.

अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या आदेशाने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्या. त्याची माहिती आम्हाला मिळाली. मग, गृहमंत्र्यांना समजली नसेल काय? तुम्हाला कोण वाचवणार? अशा शब्दात आमदार राणे यांनी आगपाखड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

'असा व्यक्ती शोधा ज्याच्यासमोर तुम्ही' श्रद्धाने बॉयफ्रेंडबद्दल व्यक्त केलं प्रेम, म्हणाली...Viral Video

SCROLL FOR NEXT