nitesh rane judicial custody esakal
महाराष्ट्र बातम्या

सरकारी वकिलांनी मागितली वेळ; नितेश राणेंची सोमवारी होणार सुनावणी

सरकारी वकीलांनी मागितली वेळ

विनोद दळवी

ओरोस: आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. परंतु विशेष सरकारी वकील प्रदीप घरत (Pradeep Gharat) यांनी वेळ मागितला आहे. त्यामुळे ही सुनावणी सोमवारी (७ रोजी) होणार आहे.

नितेश राणे यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी तात्काळ जिल्हा न्यायालयात (District Court) जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज दाखल करून घेत वकील संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली होती. त्यावर न्यायालयाने शनिवारी दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार राणेंचे वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) दुपारी न्यायालयात हजर झाले होते. परंतु या प्रकरणी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करीत वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली. आता ही सुनावणी सोमवारी होणार आहे.

शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करीत बचाव पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल केला आहे. या न्यायालयात ही सुनावणी न घेता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्याची मागणी केली होती. परंतु सरकारी वकील घरत यांनी केलेल्या अर्जावर स्वाक्षरी नव्हती. तो विहित नमुन्यात नव्हता. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्याची मागणी राणे यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज परिपूर्ण करण्यास मुदत देण्यात आली होती. तरीही वकील घरत यांनी त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यानंतर हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात देण्यात आला. यावेळी या न्यायालयाने जामीन अर्जावर सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होईल. तसेच अपूर्ण दिलेल्या अर्जातील त्रुटी दूर करण्यास सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत वेळ दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टाचा आदेश; बलात्कार प्रकरणातील दोषी तरुण तेजपालला दोन आठवड्यांत शरणागती पत्करण्याचे निर्देश

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT