Nitesh rane on mohit kamboj car attacke by shivsena tweeted clip from movie satya  sakal media
महाराष्ट्र बातम्या

"मौका सभी को मिलता है!"; 'तो' व्हिडिओ पोस्ट करत नितेश राणेंचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

राणा दांपत्याला मुंबईत पाय ठेवू देणार नाही अशी घोषणा दिल्यानंतर देखील काल राणा पती-पत्नी मुंबईत दाखल झाले. मातोश्री समोर जमलेल्या शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीसमोरुन जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या घटनेनंतर भाजप नेत्यांकडून शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या दरम्यान नितेश राणे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत 'मौका सभी को मिलता है!' असा इशार दिला आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी त्याच्या ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली आहे. ही व्हिडिओ क्लीप ही प्रसिध्द बॉलिवुड गॅंगस्टर चित्रपट 'सत्या' मधील आहे. ज्यामध्ये जेलमधील प्रसिध्द सीन दाखवला आहे. या सीनमध्ये चित्रपटाचा हिरो सत्या हा भिकू म्हात्रेच्या गळ्यावर चाकू ठेवून म्हणतो "...मौका सभी को मिलता है!." नितेश राणे यांनी देखील हा व्हिडिओ "मौका सभी को मिलता है! हम आपके साथ है! मोहित भारतीय" असं कॅप्शन देत ही क्लीप ट्विट केली आहे. या त्यामुळे सध्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दरम्यान हनुमान चालिसा पठण करण्यावरून शिवसेना आणि आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा हे दाम्पत्य आमनेसामने आले आहे. आज सकाळी नऊ वाजता मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान राणा पती-पत्नी यांनी दिलं आहे. यावरून शिवसैनिकांमध्ये संतापचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw : ११ चौकार, १ षटकार! पृथ्वीच्या आक्रमक खेळीमुळे वैभव सुर्यवंशीचे विश्वविक्रमी शतक व्यर्थ; महाराष्ट्राचा बिहारवर विजय

मुंबई- पुणे नाही तर 'या' ठिकाणी सुरू आहे सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीचा विवाहसोहळा; पाहुणे कोण कोण आले पाहिलंत का?

Mumbai Crime: आधी मिठी, गाल ओढून चावण्याचा प्रयत्न, नंतर गुप्तांगाला...; ६० वर्षीय नराधमाचे चिमुकल्यासोबत नको ते कृत्य; मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live Update : परभणीच्या जिंतूर नगरपरिषद मतदानादरम्यान तणाव

माेठी बातमी ! 'शासकीय कर्मचारी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी बहीण'चा लाभ'; शासनाच्या आदेशाला केराची टाेपली !

SCROLL FOR NEXT