Nitin Gadkari Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari: गडकरींच्या मागणीला मिळाला ग्रीन सिग्नल; वारकऱ्यांना मोठा दिलासा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठवलेल्या पत्रानंतर हा निर्णय घेण्यात आला

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यभरातून आषाढी वारीसाठी वारकरी पंढरपूरला जात आहेत. काही लोक पायी जातात. तर काही लोक बसने, रेल्वेने जातात. तर आता वारीमुळे रेल्वे बस तुडूंब भरलेल्या असतात याच पार्श्वभुमीवर विदर्भातील वारकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. (Latest Marathi News)

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विदर्भातून तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या रेल्वे गाड्या नागपूर, अमरावती व खामगाव या तीन ठिकाणांहून सुटणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून वारीसाठी विदर्भातून विशेष रेल्वे सोडव्या अशी मागणी केली होती. गडकरी यांच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. विदर्भातून आता वारीसाठी तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत.(Latest Marathi News)

या रेल्वे नागपूर, अमरावती आणि खामगावमधून सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणेज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात या रेल्वे गाड्यांना थांबा असल्यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे एसटी बसला होणारी गर्दी देखील नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान नितीन गडकरी यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेत रेल्वे मंत्रालयाकडून वारकऱ्यांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT