Nitin Gadkari sakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari Big Statement: ‘’पैसे देवून चालवल्या गेल्या बातम्या..’’ ; पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या आरोपावर गडकरींनी अखेर सोडलं मौन

Nitin Gadkari breaks silence on ethanol blending allegations in petrol : ''मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही, ज्यामुळे..'' असंही नितीन गडकरी यांनी सांगितलेलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Nitin Gadkari’s Response to Ethanol Blending Allegations: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अखेर पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळल्याच्या आरोपांवर मौन सोडले आहे. गडकरी यांनी सोमवारी सांगितले की, हे त्यांच्या निर्णयांवर नाराज असलेल्या एका शक्तिशाली आयात लॉबीचे काम आहे.

तसंच, गडकरी स्वतःची तुलना "फळ देणाऱ्या झाडाशी" करताना म्हणाले, "मी अशा टीकेला उत्तर देत नाही कारण असे केल्याने बातम्या बनतात. लोक फळ देणाऱ्या झाडालाच दगडं मारतात. याकडे आपण दुर्लक्ष करणंच चांगलं."

गडकरी म्हणाले की त्यांचे धोरण इथेनॉल मिश्रणास प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना ऊर्जा उत्पादक बनवणे आणि  प्रदूषण कमी करणे यावर केंद्रित आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या धोरणामुळे इंधन आयातीत निहित हितसंबंध असणाऱ्यांचे थेट नुकसान झाले आहे, असा दावा त्यांनी केला.

गडकरी म्हणाले, "कच्च्या तेलाच्या आयातीद्वारे सुमारे २२ लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते. या निर्णयामुळे काही लोकांच्या व्यवसायांवर परिणाम झाला व ते संतप्त झाले आणि माझ्याविरुद्ध बातम्या देण्यासाठी पैसे देऊ लागले."

गडकरींनी असंही म्हटलं की,  मी आजपर्यंत एकाही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही, ज्यामुळे ठेकेदार मला घाबरतात. तसेच, त्यांनी सांगितले की ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतील आणि खोट्या आरोपांमुळे त्रस्त होणार नाहीत. कारण, हा राजकारणाचा सामान्य आणि स्वाभाविक भाग आहे. त्यांनी म्हटले की, लोक जाणतात की सत्य काय आहे. मी आधीही अनेकदा अशाप्रकारच्या स्थितीला सामोरा गेलेलो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Wave: पुण्यासह अनेक शहरांमध्ये थंडीचा इशारा; महाराष्ट्रात हवामान कसं राहणार? विभागानं दिली मोठी माहिती

WTC 2025-27: टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवचा मोठा फटका; पाँइंट्स टेबलमधील टॉप-३ मधून बाहेर

Rohini Acharya : शिवीगाळ केली, चप्पल उगारली, मला अनाथ केलं... लालूप्रसाद यादव यांच्या मुलीची भावनिक पोस्ट

Latest Marathi Breaking News Live : पुण्याच्या येरवडा परिसरातील पेट्रोल पंपाजवळ वाहनाचा अपघात

Ladki Bahin Yojna: परितक्त्या, एकल महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून डच्चू, ई-केवायसीसाठी उरले केवळ तीन दिवस, महिलांची धावपळ सुरू

SCROLL FOR NEXT