Nitin Gadkari statement Ethanol production required for the future mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

भविष्यासाठी इथेनॉल निर्मिती आवश्यक; नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उद्योगांना सल्ला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केवळ साखर उत्पादनाकडे लक्ष दिले तर ते भविष्यकाळात उद्योगासाठी संकट ठरेल. त्यामुळे उद्योगाच्या चांगल्या भविष्यासाठी साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. साखर आणि इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स २०२२ मध्ये ते बोलत होते.

सध्या आपल्याकडे तांदूळ, मका आणि साखरेचे अतिरिक्त उत्पादन आहे, याचीही आठवण त्यांनी करून दिली. देशांतर्गत आणि जागतिक साखर व्यापारातील प्रमुख आव्हाने, त्याबाबतची धोरणे आणि साखर उद्योगाच्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी आघाडीच्या आणि जागतिक उद्योग तज्ज्ञांना एका व्यासपीठावर आणणे, तसेच भारतात अधिक नावीन्यपूर्ण आणि शाश्वत साखर आणि इथेनॉल क्षेत्र तयार करण्यासंबंधी चर्चा करणे हा या परिषदेचा उद्देश आहे.

डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इथेनॉलचे आर्थिक समीकरण लाभदायक आहे. अनेक मोठ्या वाहननिर्मिती कंपन्याही आता फ्लेक्स इंजिनांची मोटार बनवत आहेत. त्यांच्यामागोमाग फ्लेक्स इंजिनाच्या स्कूटर, मोटारसायकल व रिक्षाही बाजारात येतील, हे देखील गडकरी यांनी दाखवून दिले.

इथेनॉलचे पंप निरुद्योगी

पंतप्रधानांनी पुण्यात तीन इथेनॉल पंपांचे उद्‌घाटन केले, मात्र इथेनॉल भरण्यासाठी आतापर्यंत कोणीही आलेले नाही. साखर कारखान्यांनी आपल्या कारखान्यांमध्ये आणि इतर भागात इथेनॉल पंप सुरू करावेत. इथेनॉल वापरामुळे प्रदूषण कमी होईल आणि स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती होईल, असेही त्यांनी सांगितले. आपण सध्या ४६५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करत आहोत. येत्या पाच वर्षांत, फ्लेक्स इंजिन निर्मिती झाल्यानंतर इथेनॉलची मागणी चार हजार कोटी लिटर एवढी होईल. साखर कारखान्यांनी तुकडा तांदळापासून इथेनॉल निर्मितीवरही लक्ष द्यावे. ब्राझीलने इथेनॉलपासून विघटन होणारे प्लास्टिक बनवले आहे, जे आपल्याकडेही करता येईल, असेही त्यांनी दाखवून दिले.

विमान वाहतूक क्षेत्रात आणि भारतीय हवाई दलात इथेनॉलचा वापर वाढविण्याबाबत सरकार विचार करत आहे. दोन वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी झालेल्या लढाऊ विमानांनी शंभर टक्के बायो-इथेनॉल वापरले होते. चार लाख दूरसंचार मोबाईल टॉवरमध्ये इथेनॉल वापरण्यासंदर्भातही आपण विचार करू शकतो.

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT