Nitin Raut
Nitin Raut Nitin Raut
महाराष्ट्र

नितीन राऊत म्हणाले, विरोधकांचे आमच्यावर जास्तच प्रेम; म्हणूनच...

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : विरोधकांचे आमच्यावर जरा जास्तच प्रेम आहे. ते काँग्रेसची बदनामी करण्याची एकही संधी सोडत नाही. सध्या सुरू असलेली चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. उर्वरित अडीच वर्षे सरकार पडण्याचे कुठलेही लक्षणे दिसत नाही. त्यामुळे विरोधक अस्वस्थ आहेत. वारंवार मुहूर्त जाहीर करून सरकार पडणार असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे, असे राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले.

काँग्रेसचे (Congress) आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज आहेत. मंत्री त्यांना निधी देत नाही. त्यांच्या समस्याही ऐकून घेत नाही. त्यामुळे काही आमदार दिल्ली येथे गेले आहेत. ते काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत, अशी चर्चा राज्यात आहे. याबाबत राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी हे सर्व वृत्त खोटे आणि खोडसाळ असल्याचे सांगितले.

नव्या आमदारांना प्रशिक्षणासाठी दिल्लीला बोलावले आहे. दिल्लीत गेल्यावर सहाजिकच आपल्या नेत्यांना भेटता यावे अशी सर्वांची इच्छा आहे. यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट मागितली आहे. त्यात वावगे काही नाही. मात्र, याचा अर्थ काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. मंत्र्यांच्या तक्रारी करायला गेले आहेत असा होत नाही, असेही नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले.

भांडणे लावण्याचा प्रयत्न

महाविकास आघाडीत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. आघाडीतील एका नेत्यांची प्रशंसा करायची आणि दुसऱ्यावर टीका, असा एकमेव उद्योग विरोधकांचा सुरू आहे. काँग्रेसचा (Congress) एकही आमदार काँग्रेसच्या मंत्र्यावर नाराज नाही. आजवर एकाही आमदाराने लेखी तक्रार केलेली नाही. कोणीतरी वावड्या उठवत असल्याचा दावा नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT