Artificial_Rain 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी ! यंदा कृत्रिम पावसाचे प्रयोग नाहीत; राज्यात आठशेहून अधिक टॅंकर

तात्या लांडगे

सोलापूर : सलग पाच वर्षे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची घोषणा तत्कालीन सरकारने केली. मागच्या वर्षी 30 कोटी रुपये खर्चून कृत्रिम पावसाचे प्रयोग केले. मात्र, यंदा जगभर लॉकडाउन असल्याने अमेरिकन तंत्रज्ञ व पायलट उपलब्ध होत नसल्याने आणि राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कृत्रिम पावसाचे प्रयोग होणार नाहीत, असे आपत्ती व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले. 


कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागात गतवर्षीच्या तुलनेत 20 जूनपर्यंत सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला. मात्र, पावसात खंड पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पेरणीसाठी बळीराजाला मोठ्या पावसाची वाट पाहावी लागत आहे. धरणातील पाण्याने तळ गाठला असून पिण्यासाठी राज्यातील 900 गावे अन्‌ सोळाशे वाड्या-वस्त्यांवर टॅंकर सुरु झाले आहेत. त्यामध्ये नागपूर, यवतमाळ, अमरावती, बीड, औरंगाबाद, बुलढाणा, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, पालघर व नगर जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकर आहेत. कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने एकाच टॅंकरद्वारे अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातोय. अशा परिस्थितीत कृत्रिम पावसाची गरज व्यक्‍त होत आहे, परंतु केंद्र सरकारच्या व हवामान विभागाच्या विविध परवानग्यासाठी किमान दिड महिने लागतात आणि जुलैपासून प्रयोगाला सुरवात करावी लागते. मात्र, यंदा तशा हालचाली नसल्याने कृत्रिम पाऊस पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बळीराजाला पावसाच्या प्रतीक्षेशिवाय दुसरा पर्यायच नसल्याचे चित्र आहे.

पाच वर्षे प्रयोगाची गरज, मात्र यंदा निर्णय नाही 
मागील वर्षी करारानुसार 15 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यातील विविध भागात कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात आले. प्रयोग यशस्वी झाल्याने अनेक खासदार, आमदारांसह शेतकऱ्यांनी पत्राद्वारे समाधान व्यक्‍त केले. मागच्या वर्षी सलग पाच वर्षे कृत्रिम पावसाच्या प्रयोग करण्याची घोषणा झाली. मात्र, यंदा कोरोनामुळे कृत्रिम पावसासंदर्भात अद्याप काही निर्णय झालेला नाही. 
- श्रीरंग घोलप, प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प

 

ठळक बाबी... 

  • सोलापूर, नागपूर, मुंबईला कृत्रिम पावसाचे रडार: मात्र, विमाने चालविण्यासाठी पायलट अन्‌ प्रयोगासाठी तंत्रज्ञच नाहीत 
  • वित्त विभागाने पैशांची अडचण सांगितल्याने मागच्या वर्षी झाला नाही दोन वर्षाचा करार : यंदाही तेच कारण 
  • कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला मागील वर्षी मिळाले मोठे यश: 15 ऑक्‍टोबरपर्यंत झाला 30 कोटींचा खर्च 
  • लॉकडाउनमुळे अमेरिकन तंत्रज्ञ, पायलट आणणे अशक्‍य: परवानग्यासाठी लागणार दिड महिन्यांचा कालावधी 
  • सरासरीपेक्षा यंदा 20 जूनपर्यंत अधिक पाऊस होऊनही बळीराजाला पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षाच 
  • उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात वाढतेय टॅंकरची मागणी : राज्यभरात आठशेहून अधिक टॅंकर 
  • राज्याचे उसासहित 149.74 लाख हेक्‍टर एवढे आहे खरीप क्षेत्र; भात अन्‌ तूर, कापूस, सोयाबीनची होते सर्वाधिक लागवड 

राज्यातील खरीप क्षेत्र (1 जून ते 13 सप्टेंबरपर्यंतची पेरणी) 

  • भात: 14,77,879 हेक्‍टर 
  • खरीप ज्वारी : 2,79,328 हेक्‍टर 
  • रागी: 77,266 हेक्‍टर 
  • मका : 8,66,005 हेक्‍टर 
  • तूर : 12,07,477 हेक्‍टर 
  • मूग : 3,24,418 हेक्‍टर 
  • उडीद : 2,90,289 हेक्‍टर 
  • कापूस : 43,83,707 हेक्‍टर 
  • ऊस : 1,15,390 हेक्‍टर 
  • भुईमूग : 1,87,500 हेक्‍टर 
  • तीळ : 10,751 हेक्‍टर 
  • कारळ : 8,153 हेक्‍टर 
  • सुर्यफूल : 12,737 हेक्‍टर 
  • सोयाबीन : 39,59,549 हेक्‍टर 
  • एकूण : 149.74 लाख हेक्‍टर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांसाठी ‘जॅकपॉट’! IPL 2026 चा थरार गहुंजेत… युवा खेळाडूंच्या संघाचं होम ग्राऊंड! 2022 नंतर पहिल्यांदाच...

Zilla Parishad Election : अखेर ठरलं! जिल्हा परिषद निवडणूक होणार जाहीर, प्रशासकीय कामांना गती; सोमवारी घोषणा शक्य

Sangli Crime : तेच ठिकाण वेळही तीच, बदला घेतलाच! कॉलेजच्या दारातच तरुणावर चाकूने 14 सपासप वार; मांडी, डोके, हात, पोटावर घाव

Pune News:'पेरणे फाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभास वंदन'; लाखो आंबेडकरी अनुयायांचा उसळला जनसागर, रात्री उशिरापर्यंत अखंड रांगा!

Solapur Crime: साेलापुरात तृतीयपंथीचा खून, तिघांना पाच दिवसांची वाढीव कोठडी; तपासात धक्कादायक माहीती आली समाेर..

SCROLL FOR NEXT