Malnutrition Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही; मंत्र्यांची माहिती, अजित पवार भडकले!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही गावित यांच्या उत्तराची दखल घेत प्रश्न राखून ठेवलाय.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात कुपोषणामुळे एकही बालमृत्यू झालेला नाही, असं विधान आज अधिवेशनात आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना कोंडीत पकडलं आहे.

आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. या दिवशी राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांना विरोधकांनी कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंची आकडेवारी सादर करण्यास सांगितलं. गेल्या पाच वर्षांच्या काळात १६ आदिवासी जिल्ह्यांत कुपोषणामुळे ८ हजार ८४२ मृत्यू झाले का? याबद्दल विचारणा झाली. त्यावर गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कुपोषणामुळे बालमृत्यू झालेला नाही. आरोग्य तसंच महिला बाल कल्याण विभागाने ही माहिती दिल्याचं गावित यांनी सांगितलं.

या उत्तराला दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांनी आव्हान देत आक्षेप घेतला. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही गावित यांच्या उत्तराची दखल घेतली. कुपोषण आणि बालमृत्यूबाबत पुन्हा माहिती घ्या आणि उद्या याचं उत्तर द्या, असे निर्देश देत हा प्रश्न राखून ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील पुर्णेकर कुटुंबियांच्या भेटीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दाखल

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT