Bacchu Kadu Esakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu: निमंत्रण नाही, शिंदेंच्या जेवणाला जाणारही नाही! बच्चू कडू यांनी डिनरचं स्वतःच दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाला ताजमध्ये डिनरसाठी बोलवलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडून सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड येथे आज संध्याकाळी ७ वाजता हे स्नेहभोजन पार पडणार आहे. अजित पवार गट मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाला, त्यानंतर हे पहिलंच स्नेहभोजन पार पडणार आहे. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही.

तर स्नेहभोजनाचं निमंत्रण मला नाही असं आमदार बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी निमंत्रण देण्यात आलेलं नाही.

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. पण त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नसल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

काय म्हणालेत बच्चू कडू?

'मला काही निमंत्रण नाही. मला त्याची गरज देखील नाही. ते फक्त कॅबीनेट मंत्री आहेत त्यांनाच बोलवण्यात आलं आहे. आम्ही कॅबीनेट मंत्री नाही म्हणून मला बोलावलं नसेल. पुढे ते म्हणाले की,कॅबीनेट मंत्र्याचा दर्जा असणे आणि मंत्री असणे यामध्ये खूप फरक आहे. हा विषय मी मनाला लावून घेत नाही', असं ते म्हणालेत.

तर मंत्रीमंडळ विस्तारावर बच्चू कडू म्हणाले की, 'माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्री होणार नाही. शपथ घेणार नाही. झालं तर आम्ही राजकुमारला करू'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT