'या' जिल्ह्यात 'नो व्हॅक्‍सिन, नो एंट्री'! ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध कडक Sakal
महाराष्ट्र बातम्या

'या' जिल्ह्यात 'No Vaccine-No Entry'! निर्बंध कडक

'या' जिल्ह्यात 'नो व्हॅक्‍सिन, नो एंट्री'! ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध कडक

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील उद्धव ठाकरे सरकारनेही येथे संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अनेक निर्बंध लादले आहेत.

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूच्या (Covid-19) नव्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारनेही येथे संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अनेक निर्बंध लादले आहेत. दरम्यान, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी आणि लसीबाबत (Covid Vaccine) लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे. (No vaccine no entry campaign is being implemented in Nagar district)

या मोहिमेचे नाव 'नो व्हॅक्‍सिन, नो एंट्री' (No Vaccine - No Entry) असे आहे. ही मोहीम 25 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाऊ दिले जाणार नाही. ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांना मंगल कार्यालये, मॉल्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट, सरकारी किंवा निमशासकीय कार्यालये किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाण्याची परवानगी नाही.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील (Jawahar Navodaya Vidyalaya) 19 विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्वर गावात असलेली निवासी शाळा (Residential School) ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या (Union Ministry of Education) अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा भाग आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. शाळेत पाचवी ते बारावीपर्यंत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Rajendra Bhosle) म्हणाले, 'गेल्या तीन ते चार दिवसांत 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. काहींना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले असून काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतेक संक्रमित विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती तर आणि काहींमध्ये फक्त सौम्य लक्षणे होती.

राज्यात कडक निर्बंध

कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) शुक्रवारी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. ख्रिसमसपूर्वी (Christmas) जारी करण्यात आलेली नवीन मार्गदर्शक तत्त्वे मध्यरात्रीपासून लागू झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT