Vinod Tawde, Sharad Pawar, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Vinod Tawde, Sharad Pawar, Ajit Pawar, Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

Operation Lotus BJP: न्यायालयाच्या निकालामुळे नव्हे तर, 'यामुळे' भाजपचं 'ऑपरेशन लोट्स'; तावडे हलवतायत सूत्रं

रवींद्र देशमुख

मुंबईः मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ते १५ आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार किंवा अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला पाठिंबा देणार अशा चर्चा सुरू होत्या.

शिवसेना आणि ठाकरे गटाच्या संघर्षाचा निकाला लवकरच लागणार असून त्यामुळे या घडामोडी घडत असल्याचा सर्वांचा समज होता, मात्र भाजपच्या राज्यातील ऑपरेशन लोट्सचे वेगळेच कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपने राज्यात ऑपरेशन लोट्स सुरू केलं आहे. त्यामुळे अजित पवार, भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरू झाल्या असून भाजपची नजर काँग्रेसमधील बड्या नेत्यांवरही आहे. याचे कारण म्हणजे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे दिलेला अहवाल असल्याचं समजतं.

विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपकडून तीन सदस्यीय समिती स्थापन कऱण्यात आली होती. या समितीने संपूर्ण भारतातील लोकसभा जागांबाबतची स्थिती काय आहे, याचा अहवाल सादर केला. मात्र महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबतचा तावडे समितीचे अहवाल चिंताजनक आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला तब्बल ४२ जागा मिळाल्या होत्या. मात्र २०२४ मध्ये या जागा कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०२४ मध्ये भाजप-शिंदे गटाच्या २२ ते २५ पेक्षा कमी जागा निवडून येतील, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान तावडे समितीचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाने गांभीर्याने घेतला असून त्यानंतरच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे अजित पवार नॉट रिचेबल असणे, चौकशांचा ससेमीरा आणि भाजप नेत्यांच्या तातडीच्या दिल्ली वाऱ्या होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

एकंदरीतच भाजपने राज्यात ऑपरेशन लोट्स सुरू केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील नुकसान टाळण्यासाठीच भाजपकडून हे ऑपरेशन लोट्स सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे अजित पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करताना आपण भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना काहीही अर्थ नसल्याचं म्हटलं. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र दुसरीकडे अजित पवार भाजपसोबत जाण्यापासून का थांबले, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action: ग्राहक चिंतेत! येस बँक आणि ICICI बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

Latest Marathi Live News Update : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबलचक लांब रांगा

Shahid Kapoor And Mira Rajput: शाहिद अन् मिरानं वरळीत घेतलं आलिशान घर; किंमत माहितीये?

Rafael Nadal French Open 2024 : लाल मातीचा बादशहा नदाल पहिल्या फेरीत बाहेर

Rahul Gandhi: सावरकरांची बदनामी प्रकरण; पुणे पोलिसांनी कोर्टाला असं काय सांगितले? ज्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT