fadnvis 
महाराष्ट्र बातम्या

समता आणि समरसता यात बुद्धिभेद केला जातोय - फडणवीस

प्रा. ना. स. फरांदे यांच्यावरील स्मृतिग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात फडणवीस बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पुरोगामी-डावे आणि उजव्या विचारवंतांमध्ये 'समता' आणि 'समरसता' या शब्दांवरुन कायमचं वैचारिक वाद सुरु असतो. हा वाद विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळं पुन्हा एकदा आधोरेखित झाला आहे. "अलिकडे 'समता' आणि 'समरसता' यात बुद्धिभेद केला जात आहे," असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. प्रा. ना. स. फरांदे यांच्यावरील स्मृतिग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. (now doing distinction between equality and harmony says Devendra Fadnavis)

फडणवीस म्हणाले, "अलिकडे समता आणि समरसता यात बुद्धिभेद केला जातो. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, 'समता' हे उद्दिष्ट आहे तर 'समरसता' ही या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे" प्रा. ना. स. फरांदे यांच्या कार्याचा उल्लेख करताना ते राजकारणातील एक अतिशय सुसंस्कारित, तत्त्वनिष्ठ आणि ध्येयवादी चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. सभागृहातील कामकाज कसे चालवावे, याचे ते आदर्श होते. कितीही गंभीर प्रसंग असला तरी त्यातून ते मार्ग काढायचे, असंही फडणवीस म्हणाले.

प्रश्नोत्तराच्या शेवटच्या दहा मिनिटांत 100 प्रश्नांपैकी कुठलाही प्रश्न घेऊ, असा त्यांनी नियम केल्यानं सर्वच प्रश्नांना न्याय मिळत गेला. अन्यथा पहिल्या दहा प्रश्नांच्या बाबतीतच सरकार, अधिकारी जागरुक असायचं. स्थायी समितीच्या माध्यमांतून काम करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. जेव्हा ही पद्धत सरकारच्या प्रतिमेसाठी उपयोगी नाही असे लक्षात आलं तेव्हा नंतरच्या सरकारांनी ती बंद केली. त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजात आणि कार्यपद्धतीत अतिशय मोलाचे योगदान दिलं, अशा शब्दांत फडणवीसांनी प्रा. ना. सी. फरांदे यांचा गौरव केला.

महाराष्ट्र भाजपाचा इतिहास प्रा. ना. स. फरांदे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मूल्याधिष्ठित राजकारणावर त्यांनी कायम भर दिला. ज्या क्षेत्रात काम केले, त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपली अमिट छाप सोडली. ते खर्‍या अर्थाने आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभासारखे, अशा शब्दांत फडणवीस यांनी भाजपतील त्यांचं महत्व आधोरेखित केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोने आणि चांदीच्या ईटीएफमध्ये मोठी घसरण! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? जाणून घ्या तज्ञांचं मत...

५ तास, २७ मिनिटे...! कार्लोस अल्काराझने इतिहास घडवला, रोमहर्षक लढतीनंतर Australian Open च्या फायनलमध्ये एन्ट्री

Latest Marathi News Live Update : सुनील तटकरे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

अखेर 'कमळी'ची खरी ओळख समजणार; अन्नपूर्णा आजीची नात म्हणून दणक्यात एंट्री घेणार; 'या' दिवशी होणार महाखुलासा

NCP Ajit Pawar Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राजेश टोपेंनी दोन वाक्यात विषय संपवला, Video

SCROLL FOR NEXT