Chanadal 
महाराष्ट्र बातम्या

आता प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ; कधी ते वाचा

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर २०२० या कालावधीसाठी अख्ख्या चण्याऐवजी प्रतिमहिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात अख्ख्या चण्याऐवजी डाळ घेण्यास अधिक पसंती असल्याचे निदर्शनास आले असून, अनेक लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात विनंती केल्याने हा निर्णय आज घेण्यात आला. या चणा डाळ वितरण योजनेसाठी एकूण ७३ कोटी ३७ लाख एवढा आर्थिक भार पडणार आहे.

तसेच शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी एक हजार ५०० कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

अन्य निर्णय

  • मुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्त इमारतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांना इमारत पुनर्विकासाबाबत दिलासा म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयामुळे सुमारे १४ हजार ५०० उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना फायदा होणार आहे. 
  • आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देणारी खावटी योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. २०१३-१४ पासून ही योजना बंद होती. आता या योजनेत १०० टक्के अनुदान देण्याचे आज ठरले. यानुसार ही योजना एक वर्षासाठी सुरू ठेवण्यात येईल.
  • ‘एसईबीसी’ आणि ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षात खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला, अशा ११२ बाधित विद्यार्थ्यांना दरवर्षी सात कोटी ४९ लाख ३८ हजार ६०० रुपये प्रतिपूर्ती देण्याचे ठरले. 
  • १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व ३ दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी यांच्या सध्याच्या विद्यावेतनात दहा हजार रुपये वाढ याच महिन्यापासून करण्याचे ठरले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: ''..तर उद्याच शपथविधी'' सुनेत्रा पवारांचं नाव घेत छगन भुजबळांनी दिले स्पष्ट संकेत

Crime: भयंकर! अंगावर अनेक वार अन्...; विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला, नेमकं काय घडलं?

शाहरुख खानला सिक्युरिटीने चष्मा काढायला लावल्यावर, किंग खानने केलं असं काही की... पाहा Viral Video

Body Reset Diet: डाएट आणि फिटनेसचं रुटीन वारंवार बिघडतंय का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘रिसेट डाएट’ करून पाहा

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावर मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

SCROLL FOR NEXT