monkey-1.jpg
monkey-1.jpg 
महाराष्ट्र

Video : बिबट्यानंतर गावात आता माकडांचीही दहशत ?

भिलाजी जिरे : सकाळ वृत्तसेवा

वार्सा : पिंपळनेरच्या पश्र्चिमपट्टयात मोहगाव पैकी वडपाडा ता.साक्री येथील शेंदवड भवानीच्या पायथ्याशी असलेल्या भुईपाऊल जवळ तीन दिवसांपूर्वी एका सफेद कारमध्ये येऊन अज्ञातांनी त्यांच्या गाडीतील पिंजऱ्यात असलेले चार माकड या जंगलात सोडले. ही माकडे जंगलात न जाता गावाकडे आले व गावातील नागरिकांना ती माकडे त्रास देत असून नागरिकांना चावा घेत आहेत. त्यांनी दोन ते तीन लोकांना किरकोळ जखमी केले असुन त्यातील गंभीर जखमी किरण रामदास पवार (वय.२२) रा. वडपाडा याला पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे माजी सरपंच उत्तम देशमुख यांनी सांगितले.
        

वनविभागाकडूनच उलट माकडांचे नाव न घेण्याचा सल्ला
पिंपळनेर येथून उपचार घेतल्यानंतर किरण पवारला धुळे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. माकडाने किरणच्या पायाला चावा घेतला असून जखमा खोल असल्याचे देशमुख यांनी सांगितले. गावात आलेली माकडे अजिबातच जात नाहीत. त्याला कुणीही हटकले तरी त्याच्यावर धावून जाते व चावा घेते. तेथील माजी सरपंच उत्तम देशमुख व गावक-यांनी यासंबंधी वन विभागाशी संपर्क साधला असून वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी आले खरे, पण आल्यानंतर उलट कर्मचा-यांनीच गावकऱ्यांना  मार्गदर्शन करायला सुरूवात केली की माकडांचे नाव घेऊ नका त्यांना ईजा करू नका, असे आवाहन केले. या माकडांनी वडपाडा (ता.साक्री) या गावात व परिसरात धुमाकुळ घातला आहे. वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा अजून तीन नागरिकांना माकडाने चावा घेतला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT